ठाणे पालिका निवडणुकीत अपक्षांचा बोलबाला
निवडणुकीत अपक्षांची ‘शक्ती’ अधोरेखित!
२७ उमेदवारांना सव्वा लाखांहून अधिक मते; प्रस्थापितांची गणिते बिघडली
ठाणे, ता. १९ : ठाणे महानगरपालिका निवडणुकीत यंदा केवळ राजकीय पक्षांमध्येच नव्हे, तर अपक्ष उमेदवारांनीही मैदानात उतरून निवडणुकीची रंगत वाढवली. शिटी, नगारा, बॅट, टेबल-खुर्ची अशा विविध निशाण्यांवर निवडणूक लढवणाऱ्या २७ अपक्ष उमेदवारांनी तब्बल एक लाख ४२ हजार ५३ मते मिळवत आपला दबदबा सिद्ध केला आहे. अनेक प्रभागांत अपक्षांनी घेतलेल्या मतांमुळे मोठ्या पक्षांच्या उमेदवारांच्या विजयाचे समीकरण विस्कळित झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
ठाणे महापालिकेच्या १३१ जागांसाठी एकूण ६४९ उमेदवार रिंगणात होते, ज्यामध्ये १७५ अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. यापैकी २७ उमेदवारांनी मतदारांवर आपली ठसठशीत छाप उमटवली. २७ प्रमुख अपक्षांनी १,४२,०५३ मते मिळवली, तर उर्वरित १४८ अपक्षांना ६३,५४१ मते मिळाली. प्रभाग ५ मधील अपक्ष उमेदवार विकी पाटील यांनी सर्वाधिक ९,८९२ मते मिळवत भाजप उमेदवाराला घाम फोडला.
लक्षवेधी लढती
काही प्रभागांमध्ये अपक्ष उमेदवारांनी प्रस्थापितांच्या नाकी नऊ आणले. भूषण भोईर (प्रभाग ३) यांनी ७,७४९ मते मिळवली, मात्र अवघ्या ११ मतांनी त्यांचा पराभव झाला. ही या निवडणुकीतील सर्वांत चुरशीची लढत ठरली. सुरेखा पाटील (खारेगाव) यांनी ९,६५८ मते मिळवत आपला प्रभाव कायम ठेवला, तर विकास दाभाडे (प्रभाग २२) यांनी ९,३८२ मते मिळवून शेवटपर्यंत झुंज दिली.
प्रभागनिहाय प्रमुख अपक्ष उमेदवारांची कामगिरी
उमेदवार प्रभाग क्रमांक मिळालेली मते
विकी पाटील ५ ९,८९२
सुरेखा पाटील खारेगाव ९,६५८
विकास दाभाडे २२ ९,३८२
सुप्रिया सोडारी १५ ८,७२७
भूषण भोईर ३ ७,७४९
नितीन लांडगे ४ ६,९२५
किरण नाकती २१ ६,७०३
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

