दिव्यांग महिलेला किचन सेटचे वाटप
दिव्यांग महिलेला किचन सेटचे वाटप
रोहा, ता. १९ (बातमीदार) : लायन्स नमिता मिश्रा, लायन्स आलोक मिश्रा आणि लायन्स क्लब कोलाड यांच्या संयुक्त विद्यमाने गोवे येथील दिव्यांग महिला छाया प्रफूल धनावडे यांना किचन सेटचे वाटप करण्यात आले. डॉ. गांधी हॉस्पिटल, कोलाड येथील लायन्स क्लब व्हिजन सेंटरमध्ये शुक्रवारी (ता. १६) हा उपक्रम पार पडला.
समाजातील गरजू, दीनदुबळ्यांना सहकार्य करण्यासाठी मिश्रा दांपत्याचे मोलाचे योगदान सदैव उल्लेखनीय राहिले आहे. डॉ. गांधी हॉस्पिटलसमोर वडापाव व चहा टपरी चालवून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या छाया धनावडे यांना स्वयंपाकघरातील साहित्याची गरज लक्षात घेऊन किचन सेट मोफत प्रदान करण्यात आला.
याप्रसंगी लायन्स नमिता मिश्रा, लायन्स आलोक मिश्रा, ए. के. सहा, हेमंत लोणकर, लायन्स क्लबचे अध्यक्ष ॲड. रवींद्र लोखंडे, माजी अध्यक्ष नरेश बिरगावले, उपाध्यक्ष डॉ. श्याम लोखंडे, डॉ. विनोद गांधी, सचिव अलंकार खांडेकर, खजिनदार गजानन बामणे, दिनकर सानप, विठ्ठल सावळे, दिलीप मोहिते, पूजा लोखंडे, छाया व प्रफूल धनावडे तसेच क्लबचे सदस्य उपस्थित होते.
फोटो कॅप्शन : दिव्यांग दाम्पत्यांना किचन साहित्य वाटप करताना नमिता व अलोक मिश्रा व अन्य मान्यवर.

