वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचा यशोस्तव वर्धापन सोहळा

वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचा यशोस्तव वर्धापन सोहळा

Published on

वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्टचा वर्धापन सोहळा
राज्यासह देश-विदेशातून ७००हून अधिक उद्योजकांची उपस्थिती

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २० : स्थापना झाल्यापासून अवघ्या दोन वर्षांत सात हजारांहून अधिक व्यापाऱ्यांना एका व्यासपीठावर आणत, ६०० सभासद जोडणाऱ्या ‘वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट’चा द्वितीय वर्धापनदिन नुकताच परळ येथील राष्ट्रीय मिल मजदूर सेवा संघ येथे पार पडला. या निमित्ताने आयोजित ‘यशोत्सव २०२६’ या कार्यक्रमाला राज्यासह देश-विदेशातून ७००हून अधिक उद्योजकांनी उपस्थिती लावली होती.
सोहळ्यात समाजातील यशस्वी व्यावसायिकांना ‘उद्योग रत्न’, तर ज्येष्ठ व्यावसायिकांना ‘उद्योग श्री’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच नुकत्याच पार पडलेल्या नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकांमध्ये नगराध्यक्षपदी निवडून आलेल्या समाजातील लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
वैश्य समाजाच्या पारंपरिक व्यापारी ओळखीला नवे बळ देत व्यवसाय, उद्योजकता आणि सामाजिक बांधिलकी यांचा समतोल साधण्यासाठी ‘वैश्य ग्लोबल चॅरिटेबल ट्रस्ट’ची स्थापना दोन वर्षांपूर्वी झाली. या ट्रस्टमुळे व्यापाराला नवीन चालना, नवीन व्यासपीठ मिळाले. उद्योजकता पुनरुज्जीवित करण्यासाठी ट्रस्टने संघटनात्मक प्रयत्न सुरू केले.

सात हजार व्यापारी

अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत ट्रस्टशी सात हजारांहून अधिक व्यापारी जोडले गेले असून ५६ कोटी रुपयांहून अधिक परस्पर व्यापार नोंदवणारे ६०० पेक्षा अधिक सक्रिय सभासद आहेत. मुंबई व मुंबईबाहेर मिळून ट्रस्टचे एकूण सात विभाग कार्यरत असून त्यात महिला, युवा उद्योजक व नोकरशहा विभागांचा समावेश आहे. या माध्यमातून आतापर्यंत ५००हून अधिक व्यावसायिक बैठका घेण्यात आल्याचे संस्थेने सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com