पक्षांच्या जाहीरनाम्यांचा अभ्यास
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १९ : नवी मुंबई महापालिकेची सहावी निवडणूक पार पडल्यानंतर गेल्या पाच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर सभागृहात लोकप्रतिनिधी विराजमान होणार आहेत. तत्पूर्वी आर्थिक वर्ष संपत आल्यामुळे महापालिका प्रशासनाने अर्थसंकल्पाची तयारी सुरू केली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज (ता. १९) पार पडलेल्या बैठकीत शिंदे यांनी अर्थसंकल्पाकरिता निवडणूक काळात राजकीय पक्षांचे जाहीरनाम्यातील मुद्दे अभ्यास करण्याच्या सूचना केल्या आहेत. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांची सांगड घालण्याच्या दृष्टीने ही सूचना महत्त्वाची असल्याची चर्चा आहे.
२०२० मध्ये नवी मुंबई महापालिकेची लोकप्रतिनिधींची मुदत संपली. त्यानंतर मार्चमध्ये कोरोना महामारीने शिरकाव केल्यामुळे शहरात लॉकडाऊन घोषित झाला. त्यामुळे नंतरच्या काळात महापालिकेवर प्रशासक राजवट आली. ही राजवट विविध कारणांमुळे लांबणीवर पडत गेली. गेल्या पाच वर्षांत महापालिकेमध्ये सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीचे अधिकार प्रशासक म्हणून आयुक्तांना होते. त्यामुळे महापालिकेचे पाचही अर्थसंकल्प प्रशासकांनी सादर करून मंजूर केले. नुकत्याच संपलेल्या निवडणुकीमुळे महापालिकेला पाच वर्षांनी लोकप्रतिनिधी मिळाले आहेत.
पाच वर्षांत लोकप्रतिनिधी महापालिकेत नसल्यामुळे जनतेकडून येणाऱ्या कामांचा अर्थसंकल्पात समावेश फारसा होत नव्हता. प्रशासनाला शहरात आवश्यक वाटणाऱ्या पायाभूत सुविधांच्या गरजेनुसार तरतूद केली जात होती. त्यामुळे वाशीतील एनएमएमटीच्या बसडेपोवर तयार केलेले वाणिज्य संकूल आणि जलतरण तलाव हे दोन मोठे प्रकल्प पाच वर्षांत पूर्णत्वास आली. पाच वर्षांतील २०२० ते २०२२ हे दोन्ही वर्षे कोरोनासोबत गेली. या काळात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कोट्यवधींचा चुराडा झाला आहे. त्यापैकी किती खर्च खरंच अत्यावश्यक होता आणि नाही, याबाबतचे स्पष्टीकरण सभागृहात लोकप्रतिनिधी घेणार आहेच, परंतु पाच वर्षांत लोकांची राजवट नसल्याने सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये नवनवीन प्रकल्प सुचवले आहेत. त्यापैकी काही खरंच जनतेच्या सोयीचे आहेत. यातील काही प्रकल्पांचा महापालिकेच्या अर्थसंकल्पात समावेश झाला, तर लोकांनाच फायदा होणार आहे.
पुढील वर्षात सर्वात मोठा प्रकल्प
नेरूळ येथे महापालिकेतर्फे तयार केले जात असलेले ५०० खाटांचे अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे प्रकल्प महत्त्वाचे असणार आहेत. या प्रकल्पावर खर्चासाठी महापालिकेने अंदाजे २५० कोटींची तरतूद केली आहे.
या पक्षांनी काढलेले जाहीरनामे
महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप, शिवसेना आणि ठाकरे गट व मनसे या पक्षांनी प्रचारासाठी जाहीरनामे प्रसिद्ध केले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटांनी जाहीरनामे प्रसिद्ध केले नव्हते. या पक्षांकडे लोकांकडे मते मागण्यासाठी मुद्दे नव्हते. अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
मागील पाच वर्षांत महापालिकेवर लोकप्रतिनिधी नव्हते. त्यामुळे गेल्या वर्षी महापालिकेचा अर्थसंकल्प अधिक लोकाभिमुख व्हावा, याकरिता नागरिकांकडून अर्थसंकल्पासाठी काही नावीन्यपूर्ण सूचना आणि कल्पना मागवल्या होत्या. त्यानुसार आता राजकीय जाहीरनाम्याचा अभ्यास करण्याच्या सूचना विभागप्रमुखांना दिल्या आहेत. सध्या अर्थसंकल्पाची प्राथमिक स्तरावर चर्चा सुरू आहे.
- डॉ. कैलास शिंदे, आयुक्त, नवी मुंबई महापालिका
शहरात सध्या सुरू असलेले प्रकल्प (खर्च कोटींमध्ये)
ऐरोली-घणसोली उड्डाणपूल ५५०
सायन्स पार्क १५०
ऐरोली नाट्यगृह १००
नेरूळ ते बेलापूरदरम्यान जलवाहिनीचे काम १२५
आर्थिक वर्ष मूळ अर्थसंकल्पीय तरतूद (कोटी) सुधारित / प्रत्यक्ष खर्च (कोटी) वित्तीय स्थिती आणि मुख्य भर
२०२०-२१ ३,११४.२० (अंदाजे) उपलब्ध माहितीनुसार महसुली खर्चावर भर
कोरोनातील आरोग्य आणीबाणी, सुविधा
२०२१-२२ ३,९०३.८३ २,४००-२,५०० (महसुली अंदाजित)
नागरी सुविधांची देखभाल, स्वच्छता मोहिमेवर खर्च
२०२२-२३ ४,५९४.९१ २,४९७ (महसुली प्रत्यक्ष)
शहराच्या सौंदर्यीकरणासाठी ७६६ कोटींचा खर्च समाविष्ट
२०२३-२४ ४,७८६.१८ ३,४०८.५० (सुधारित)
लिडार सर्वेक्षण आणि मालमत्ता कर वसुलीवर लक्ष
२०२४-२५ ४,९५०.०० ३,७८८.८४ (सुधारित)
भांडवली प्रकल्प, सायन्स पार्क आणि नाट्यगृहाचे काम
२०२५-२६ ५,७०९.९५ ५,६८४.९५ (प्रस्तावित)
ग्रोथ हब संकल्पनेवर आधारित शाश्वत विकास
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

