निवासी डॉक्टरांच्या समस्या सुटणार

निवासी डॉक्टरांच्या समस्या सुटणार
Published on

मुंबई : राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कार्यरत निवासी डॉक्टरांचे मानधन, शैक्षणिक कालमर्यादा आणि नियुक्ती प्रक्रियेतील अडथळे या प्रश्नांबाबत सेंट्रल मार्डच्या शिष्टमंडळाने सोमवारी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय (डीएमईआर) येथील संचालकांची भेट घेतली. या वेळी संचालकांनी समस्या लवकरच सोडवण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत निवासी डॉक्टरांच्या कामकाजावर आणि प्रशिक्षणावर थेट परिणाम करणाऱ्या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या रुजू होण्याच्या प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात होणार असल्याची माहितीही या वेळी देण्यात आली. डीएमईआरच्या संचालकांनी शिष्टमंडळाने मांडलेले सर्व मुद्दे गांभीर्याने ऐकून घेतले. या प्रश्नांवर तातडीने प्रशासकीय कार्यवाही करून योग्य निर्णय घेतले जातील तसेच संबंधित महाविद्यालयांना आवश्यक सूचना दिल्या जातील, असे आश्वासन

त्यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com