चित्रकला स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वासिंद, ता. १९ : एनआयई सकाळची चित्रकला स्पर्धा रविवारी (ता. १८) वासिंद येथील श्री. आर. के. पालवी स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. यात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. पहिलीपासून वयोवृद्धांपर्यंत ही स्पर्धा विविध गटात घेण्यात आली होती. या स्पर्धेचे वैशिष्ट्ये म्हणजे ही गिनीज वर्ल्ड ऑफ बुकमध्ये नोंद झालेली आहे.
सकाळी ९ ते १२च्या दरम्यान रविवारची सुट्टी असूनही चिमुकल्यांनी या स्पर्धेचा आनंद घेतला. ही स्पर्धा उत्तमरित्या पार पाडण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पालवी यांनी विशेष मेहनत घेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी शाळेचे शिक्षक वर्गही उपस्थित होते. शाळेचे सुपरवायझर दीपाली दिवाणे, सपना तारमले, कलाशिक्षक हरिचंद्र आणि जयश्री यांनी मोलाचे सहकार्य केले. सकाळ वृत्तपत्र विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबवत असते. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचनया कलागुणांना वाव मिळत असून त्यांना या स्पर्धेचा भविष्यात प्रत्येक स्पर्धा परीक्षेत आणि शालेय जीवनात फायदा होत असतो. आमचे विद्यार्थी या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात, अशी प्रतिक्रिया मुख्याध्यापक रवींद्र पालवी यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

