‘मुंबई क्लायमेट वीक’चे आयोजन
मुंबईत हवामान संकटांवर चर्चा
युनिसेफ इंडियाच्या माध्यमातून ‘क्लायमेट वीक’चे आयोजन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : मुंबईत १७ ते १९ फेब्रुवारीदरम्यान ‘क्लायमेट वीक २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. युनिसेफ इंडिया, आयोजक प्रोजेक्ट मुंबई आणि युवा यांच्या सहकार्याने या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुले आणि तरुणांना हवामानविषयक कृती व धोरण चर्चांमध्ये सहभागाची संधी या माध्यमातून उपलब्ध होईल.
मुंबई क्लायमेट वीक हे हवामान बदलांवर नागरिकांच्या नेतृत्वाद्वारे उपाययोजना राबवणारे भारतातील पहिले ‘शहर व्यासपीठ’ आहे. आशियात जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवरील कामांना प्राधान्य देणे आणि स्थानिक लोकांचा सहभाग वाढवणे, हा याचा उद्देश आहे. हवामान संकट हे बालहक्कांवरही संकट असून, त्यासाठी युनिसेफ इंडिया, युवा आणि प्रोजेक्ट मुंबई हे एकत्र येऊन संपूर्ण आठवडाभर हवामान संवाद व प्रत्यक्ष कृतीत बालक व तरुणांचे अनुभव, दृष्टिकोन आणि उपाय मांडतील. युनिसेफ इंडिया यांच्या प्रतिनिधी सिंथिया मॅकॅफ्री यांनी सांगितले की, ‘समाजात बदल घडविणारे प्रभावी घटक म्हणजे मुले आणि तरुण होय, हवामान उपायांच्या केंद्रस्थानी बालकांना ठेवून, आम्ही शासनासोबत त्यांच्या हक्कांमध्ये तसेच स्वच्छ आणि सुरक्षित भविष्यात गुंतवणूक करतो. मुंबई क्लायमेट वीक तरुणांना ई-कचऱ्यासारख्या आव्हानांवर व्यवहार्य उपाय पुढे नेण्यासाठी व्यासपीठ देते.’
पर्यावरणपूरक कृतींची नोंद
मुंबई क्लायमेट वीकदरम्यान एका रोड शोचे आयोजन करण्यात आले आहे. याचा उद्देश विद्यार्थ्यांचा हवामान कृतीतील सहभाग वाढवणे आणि मुंबई क्लायमेट वीकदरम्यान होणाऱ्या व्यापक धोरणात्मक व नागरी चर्चांशी कॅम्पस पातळीवरील उपक्रम जोडणे, हा आहे. युनिसेफ ‘मिशन लाइफ तसेच ‘मेरी लाइफ’सारख्या व्यासपीठांद्वारे युवा नेतृत्वाखालील हवामान कृतीला पाठबळ देते. ‘मेरी लाइफ अंतर्गत ३१.९ दशलक्षहून अधिक पर्यावरणपूरक कृती नोंदविण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्रातील युवा सहभाग व जलसंवर्धन कार्यक्रमातून १० लाखांहून अधिक तरुणांपर्यंत पोहोचण्यात यश आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

