बदलापुरात शिवसेनेची ढासळती पकड

बदलापुरात शिवसेनेची ढासळती पकड

Published on

बदलापूर, ता. १९ (बातमीदार) : बदलापूरच्या राजकारणात मोठी उलथापालथ घडवणारी घटना समोर आली आहे. शिवसेना (शिंदे गट) उपशहरप्रमुख आणि बहुजन युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले प्रवीण राऊत यांनी शिवसेनेला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली असून, शिवसेनेसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.
प्रवीण राऊत यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते गणेश लामतुरे, आकाश राऊत, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. शिवसेना शहरप्रमुखांकडून सातत्याने सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप करत, स्वीकृत नगरसेवक पद देताना प्रत्यक्ष निवडून आलेल्या नगरसेवकांशी कोणतीही चर्चा न करता केवळ निवडणुकीपुरते पक्षात आलेल्या व्यक्तीला प्राधान्य दिल्यामुळे तीव्र नाराज असल्याचे राऊत यांनी यापूर्वीच जाहीरपणे व्यक्त केले होते. ही नाराजी पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचूनही कोणतीही दखल घेतली न गेल्याने अखेर त्यांनी हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांच्या खंबीर, विकासाभिमुख आणि जनतेच्या विश्वासावर उभ्या असलेल्या नेतृत्वाखाली, अनेक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशभर सुरू असलेले विकासकार्य तसेच राज्यातील भाजप सरकारच्या लोकाभिमुख धोरणांवर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश केल्याचे प्रवीण राऊत यांनी यावेळी सांगितले. पक्षप्रवेशामुळे बदलापूर शहरातील भाजप संघटना अधिक मजबूत होणार असून, तळागाळातील समाजापर्यंत विकास पोहोचवण्याच्या कार्याला अधिक गती मिळेल, असा विश्वास भाजप नेत्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घडामोडीमुळे बदलापूरमध्ये शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत अस्वस्थता आणि नाराजी उघडपणे दिसून येत आहे. आगामी स्थानिक राजकारणात याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com