राज्यभरात ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा उत्साहात
कल्पकतेला रंगाची जोड
गोरेगाव येथे ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा उत्साहात
मालाड, ता. १८ (बातमीदार) ः संपूर्ण राज्यभरात ‘सकाळ’ एनआयई आयोजित चित्रकला स्पर्धा रविवार (ता. १८) मोठ्या उत्साहात पार पडली. गोरेगाव पूर्व येथील निवारा विद्यालय या स्पर्धा केंद्रावर शेकडो विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. स्पर्धेदरम्यान विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेला रंग देत सुंदर चित्रे रेखाटली.
दहिसर, कांदिवली, मालाड व गोरेगाव परिसरातील निवारा विद्यालय, यशोधम इंग्लिश स्कूल, गुरुकुल विद्यालय (मराठी), हरनाई विद्यालय, संमित्र विद्या मंदिर, बैरामजी जीजीभोय विद्यालय, आदर्श विद्यालय, सेंट थॉमस इंग्लिश स्कूल, क्रिस्ट किड्स इंग्लिश हायस्कूल, महाराष्ट्र विद्यालय, लक्षधाम हायस्कूल, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण स्कूल, शैलेंद्र एज्युकेशन सोसायटी, उत्कर्ष मंदिर, ठाकूर श्याम नारायण हायस्कूल, नंदादीप विद्यालय आदी शाळांतील विद्यार्थी सहभागी झाले होते.
नागरी निवारा परिषद संचालित निवारा विद्यालयाच्या मुख्याध्यापिका समीक्षा संतोष साळसकर, शिक्षक प्रशांत विलास माईणकर आणि शिक्षकेत्तर कर्मचारी रोहन राजाराम पाटील, सागर रवींद्र शिंदे, आनंद विश्वनाथ ठाकूर, नागेश बाळा शेट्ये यांनी स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी मोलाचे योगदान दिले. स्पर्धेसाठी शाळेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. स्पर्धेदरम्यान पालक समृद्धी भरडे आणि निवारा विद्यालयातील विद्यार्थी राहुल चकोर, सृष्टी शिवाजी साळुंके, राजवीर इंगळे, हेतल दिनेश, गोणबरे, वैदेही पाटील, अक्षदा भगत, रश्मी बडबे, शहनाज फकीर व सिद्धी काकडे यांनी पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली.
विशेष विद्यार्थ्यांचा उत्साही सहभाग
स्पर्धेचे विशेष आकर्षण म्हणजे कांदिवली येथील डॉ. कुसुमताई नरवणे बधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्साही सहभाग घेतला होता. या विद्यार्थ्यांनी वेळेत केंद्रावर उपस्थित राहून सुंदर चित्रे साकारली. यावेळी त्यांच्या शिक्षिका रुपाली तावडे पूर्ण वेळ विद्यार्थ्यांसोबत उपस्थित होत्या. तसेच शशी मंगलम स्पेसिएल स्कुलच्या सविता चावरे यांचे सहकार्य लाभले. उत्कर्ष मंदिर (पुष्पा पार्क) येथील मुख्याध्यापिका मनीषा सोष्टे व सहाय्यक शिक्षिका सुरभी सुभाष पवार यांनीही केंद्रात उपस्थित राहून सहकार्य केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

