सीईटीसाठी अपार नोंदणी प्रक्रिया सुलभ
‘सीईटी’साठी अपार नोंदणी प्रक्रिया सुलभ
मुंबई, ता. १९ : राज्य सीईटी सेलतर्फे राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या सीईटीसाठी अपार आयडी बंधनकारक करण्यात आली आहे. ‘अपार आयडी आणि त्याची नोंदणी प्रक्रिया अत्यंत सुलभ आणि विद्यार्थी, पालकांना सहजपणे करता येणार असल्याने विद्यार्थ्यांनी यासाठी कोणतेही दडपण न घेता सीईटीच्या नोंदणीची प्रक्रिया करून घ्यावी,’ असे आवाहन सोमवारी (ता. १९) सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी केले.
सीईटी सेलने अपार आयडी तयार करण्यासाठी प्रक्रिया आणि त्याची माहिती आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. त्यात विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यासाठीचे टप्पे आणि अगदी साध्या शब्दांत ही माहिती असून त्या माहितीनुसार नोंदणीची प्रक्रिया केल्यानंतर विद्यार्थ्यांना अगदी काही मिनिटांमध्ये या अपार आयडीची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते. यासाठी विद्यार्थ्यांना स्वतःचे ईमेल, मोबाईल आणि ज्या शैक्षणिक पात्रता आहेत, त्याची माहिती एकदा जोडल्यास पुढे सीईटीसाठी हिच नोंदणी अपडेट होणार असल्याने विद्यार्थ्यांचा या नोंदणी प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणात वेळ वाचण्यास मदत होणार आहे. सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी सांगितले की, ‘अपार आयडी तयार करण्याची प्रक्रिया अतिशय सोपी व सुलभ आहे. हा आयडी तयार करण्यासाठी उमेदवारांना दहावी किंवा बारावीच्या गुणपत्रिकेतील तपशील भरण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे अशा शैक्षणिक तपशिलांचा अभाव असल्यास उमेदवाराला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही.’ दरम्यान, वैयक्तिक किंवा डेमोग्राफिक तपशिलांमध्ये तफावत असल्याच्या कारणावरून कोणताही सीईटी अर्ज अपात्र, नामंजूर किंवा बाद करण्यात येत नाही, असे विभागाकडून स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, सीईटी ऑनलाइन अर्ज प्रणालीत उमेदवारांना त्यांचे नाव, जन्मतारीख व इतर वैयक्तिक तपशील वैध पुराव्यांनुसार भरण्याची पुरेशी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. उमेदवारांनी आधार कार्ड, बारावी प्रमाणपत्र किंवा इतर मान्य दस्तऐवजांनुसार माहिती भरावी, असे आवाहन सीईटी सेलने केले आहे.
--
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

