जागृती लखानी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

जागृती लखानी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

Published on

जागृती लखानी यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास
माय-लेकावर विविध क्षेत्रातून वाढदिवसानिमित्त कौतुकांचा वर्षाव

मुंबई, ता. २० : ब्राइट आउटडोर मीडिया लिमिटेडच्या संचालिका जागृती योगेश लखानी यांचा वाढदिवस १६ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रांतून त्यांच्यावर कौतुकासह, शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यातच त्यांचा मुलगा अनुग्रह याचा दहावा वाढदिवसही २४ जानेवारी रोजी साजरा करण्यात येत आहे. लखानी कुटुंबीयांनी नेहमीच देखाव्यापेक्षा मूल्यांना प्राधान्य दिले असून, हे वाढदिवस करुणा, मूल्यनिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून साजरा करण्यात येत असल्याचे लखानी कुटुंबीयांनी सांगितले.

गुजरातमधील सुरत येथे जन्मलेल्या जागृती यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी आहे. अनेक अडचणींवर मात करत त्यांनी कुटुंबासाठी भक्कम आधार निर्माण केला आणि कुटुंबाच्या यशामागे ठामपणे उभ्या राहिल्या. १९८७ मध्ये डॉ. योगेश लखानी यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी कुटुंबाला प्राधान्य देत ब्राइट आउटडोरची धुरा सांभाळण्यास सुरुवात केली. ब्राइट आउटडोर मीडिया लिमिटेडला यशाच्या शिखरावर पोहोचवताना त्यांनी योगेश यांना खंबीर साथ दिली. कठीण काळात घर सांभाळून त्यांनी संस्थेसाठी केलेले नियोजन, व्यवस्थापन कंपनीच्या प्रगतीसाठी मोलाचे ठरले. ब्राइट आउटडोर मीडिया लिमिटेडचे पूर्णवेळ संचालकपद सांभाळताना त्यांचा शांत, नम्र स्वभाव तसेच मूल्यनिष्ठा आणि जबाबदारीच्या भावना सर्वांना प्रेरणा देत आहे. भारतासह अमेरिका, युरोप, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, मध्य पूर्व व दक्षिण आफ्रिका अशा देशांतील प्रवासामुळे जागृती यांचा दृष्टिकोन व्यापक झाला आहे. तरीही त्या आपली संस्कारांशी नाळ जपून आहेत. या धावपळीत त्यांनी कुटुंबाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही, मुलगा अनुग्रह याच्या संगोपनाला त्यांनी नेहमीच महत्त्व दिले असून नैतिक मूल्ये, उत्तम शिक्षण आणि शिस्तीचे संस्कार त्यांनी अनुग्रहमध्ये रुजवले आहेत. दुसरीकडे जागृती यांनी समाजसेवेतही सक्रिय सहभाग घेत अनाथालये, वृद्धाश्रम व गरजू घटकांसाठी वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला. त्यांचा सेवाभाव आणि आध्यात्मिक दृष्टिकोन अनेकांना प्रेरणा देणारा आहे. ब्राइट आउटडोर मीडिया लिमिटेडचे अध्यक्ष डॉ. योगेश लखानी हे त्यांना ‘घराची लक्ष्मी’ असे संबोधतात. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या यशासोबतच त्यांच्या समर्पित आणि निःस्वार्थ जीवनप्रवासाचा योगेश लखानी आवर्जून उल्लेख करतात.


अनुग्रहवर नैतिक मूल्‍यांसह, शिस्तीचे संस्कार!
अनुग्रह या नावाचा अर्थ ‘कृपा’ व ‘करुणा’ आहे. २४ जानेवारी २०१६ रोजी जन्मलेल्या अनुग्रहवर लहान वयातच जागृती लखानी यांनी नैतिक मूल्यांसह, शिस्तीचे संस्कार रुजवले. २०२५ मध्ये अनुग्रहने आपल्या वडिलांसोबत प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभाग घेतला. तसेच युरोप व न्यूझीलंडसह विविध देशांतील प्रवासामुळे त्यांचा दृष्टिकोन व्यापक झाला असून सांस्कृतिक आदर व संवेदनशीलतेचे महत्त्व त्यांनी आत्मसात केल्याचे लखानी कुटुंबीयांनी सांगितले. कमी वयातच अनुग्रह आपल्या पालकांसोबत समाजसेवेच्या उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेत आहे. अनुग्रह हा दर शनिवारी गरजू नागरिकांसाठी अन्नवाटपाचे उपक्रम, तसेच भिवंडी परिसरातील आदिवासी भागांमध्ये अन्न व वस्त्रवाटपाच्या माध्यमातून वंचित घटकांना मदत करत आहे. या उपक्रमांतून सेवा ही जीवनपद्धती असल्याचा संदेश दिला जात आहे. याबाबत डॉ. योगेश लखानी म्हणाले, ‘दयाळू, संवेदनशील आणि सामाजिकदृष्ट्या जागरूक व्यक्तिमत्त्व घडवणे, हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यातूनच आम्ही अनुग्रहचे संगोपन करत आहोत. तर जागृती लखानी यांनी सांगितले की, ‘आमच्यासाठी वाढदिवस म्हणजे केवळ उत्सव नसून कृतज्ञतेचा क्षण आहे. दुसऱ्या प्रति करुणा हीच खरी भावना असल्याचे आम्ही अनुग्रहला सांगत आलो आहे. अनुग्रहचा वाढदिवस हा केवळ वैयक्तिक आनंदाचा क्षण नसून, ब्राइट आउटडोर मीडिया लिमिटेडच्या सामाजिक मूल्यांशी सुसंगत अशा करुणा, सेवा आणि जबाबदारीच्या विचारांचे सशक्त प्रतिबिंब आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com