रानातल्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची लोटणार गर्दी
रानातल्या गणपतीच्या दर्शनासाठी गर्दी
तुर्भे, ता. २१ (बातमीदार) : तुर्भे एमआयडीसी परिसरातील गणपती पाड्यात रानातला गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या प्राचीन स्वयंभू श्री गणेश मंदिरात माघी गणेश जयंतीनिमित्त उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तिमय वातावरणात जयंती सोहळा साजरा होणार असून, दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित आहे.
या मंदिराची ओळख नवी मुंबईसह मुंबई, ठाणे, पनवेल परिसरातील गणेशभक्तांमध्ये विशेष आहे. दर संकष्टीला येथे भाविकांची गर्दी उसळते. विशेषतः माघी गणेश जयंतीच्या दिवशी मंदिर परिसरात जत्रेचे स्वरूप तयार होते. पहाटेपासूनच दर्शनासाठी रांगा लागत असून, ट्रस्टतर्फे महाप्रसादाचे आयोजन केले जाते.
श्री गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट, शिरवणे यांच्या वतीने माघी गणेशोत्सव गुरुवारी (ता. २२) चिंचोली तलावाजवळील स्वयंभू श्री गणेश देवस्थान येथे साजरा होणार आहे. या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टचे सचिव व माजी महापौर जयवंत सुतार यांनी केले आहे.
दरम्यान, पहाटे अभिषेक व महापूजा, तर दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात येणार आहे. परिसर भक्तिभावाने भारावून जाणार असून तुर्भेबरोबरच कोपरी गावातही माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

