डोंबिवलीत घरगुती गॅस गळतीचा भीषण स्फोट
डोंबिवलीत घरगुती गॅस गळतीने स्फोट
लहान मुलासह पाच जण जखमी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २० : घरगुती गॅस सिलिंडरमधून झालेल्या गळतीमुळे मध्यरात्री भीषण स्फोट झाला. यात लहान मुलासह पाच जण जखमी झाल्याची घटना डोंबिवली पूर्वेतील नवनीतनगर संकुलात घडली. या स्फोटात एका घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेजारील घरांनाही फटका बसला आहे.
जखमींची नावे केतन देढिया (वय ३५), मेहुल वासाड (४०), विजय घोर (४५), हरीश लोढाया (५०) आणि पार्श्व हरीश लोढाया (७) अशी आहेत. यामध्ये घरमालक केतन देढिया हे सुमारे ५० टक्के भाजल्याने त्यांना प्रथम खासगी रुग्णालयात आणि नंतर सायन रुग्णालयात हलविण्यात आले आहे. उर्वरित चार जखमींना प्राथमिक उपचार करून घरी सोडण्यात आले आहे.
नवनीतनगर संकुलातील एका फ्लॅटमध्ये केतन देढिया राहतात. त्यांच्या घरातील गॅस सिलिंडरमधून गळती होत होती. मध्यरात्री केतन घरी परतल्यानंतर त्यांनी लाइट सुरू करताच साचलेल्या गॅसमुळे जोरदार स्फोट झाला. या स्फोटात केतन गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
स्फोटाच्या धक्क्यामुळे शेजारील फ्लॅटमधील मेहुल वासाड आणि विजय घोर हे किरकोळ जखमी झाले. तसेच खिडकीच्या काचा व ग्रील तुटून खाली कोसळल्याने इमारतीच्या तळाशी असलेले हरीश लोढाया आणि त्यांचा सात वर्षांचा मुलगा पार्श्व यांच्यावर काचा पडल्या. त्यात ते दोघे किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना सोसायटीतील रहिवाशांनी तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले. घटनेची माहिती मिळताच डोंबिवली अग्निशामक दल व मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

