नवे शौचालय खुले कधी होणार?
नवे शौचालय खुले कधी होणार?
चार महिन्यांपासून धारावीकर उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
धारावी, ता. २० (बातमीदार) : धारावीतील शास्त्रीनगर परिसरातील महाराणा सोसायटीच्या बाजूला असलेले बैठे शौचालय नादुरुस्त झाले होते. त्याची बातमी दैनिक ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध होताच पालिकेने नादुरुस्त शौचालय तोडून नव्याने शौचालय बांधणीला सुरुवात केली होती. दोन वर्षांपूर्वी नवीन शौचालय उभारणीसाठी सुरुवात करण्यात आली होती. शौचालय उभारून चार महिने झाले आहेत, तरीही ते वापरण्यासाठी खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत.
जुने शौचालयाचे तोडकाम केल्यानंतर जवळपास एक वर्षानंतरही नव्या शौचालयाच्या कामास सुरुवात झाली नव्हती. दैनिक ‘सकाळ’मध्ये पुन्हा त्याबद्दल बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर झोपी गेलेल्या पालिका प्रशासनाने जागे होत शौचालय बांधण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, नव्याने उभारण्यात आलेले शौचालय अद्याप खुले झालेले नाही.
दरम्यान, संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात पाहणी करण्यासाठी सूचना देतो, असे पालिकेच्या ग/उत्तर विभागाचे मनपा सहाय्यक आयुक्त विनायक विसपुते यांनी सांगितले.
धारावी : नव्याने बांधण्यात आलेले शौचालय चार महिन्यांनंतरही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.
फोटो - 991

