शिक्षक भरती प्रक्रिया होणार सोपी

शिक्षक भरती प्रक्रिया होणार सोपी

Published on

शिक्षक भरती प्रक्रिया होणार सोपी
पवित्र पोर्टलच्या कार्यप्रणालीत सुधारणा
मुंबई, ता. २० : राज्यातील सरकारी, अनुदानित शाळांमध्ये शिक्षक भरती प्रक्रियेसाठी राबविण्यात येत असलेल्या पवित्र पोर्टलच्या कार्यप्रणालीत सुधारणा करण्यात आली आहे. त्यामुळे या पोर्टलवर भरती प्रक्रियेसाठी नवीन सुधारित नियम लागू होतील. यात निवड झालेल्या उमेदवारांना एकच वेळ निवडीच्या शिफारशीच लागू होतील. यामुळे आतापर्यंत पोर्टलवर असलेल्या निवडीसंदर्भातील तांत्रिक चुकांचा शालेय शिक्षण विभागासह शाळांनाही होणारा त्रास कमी होण्यास मदत मिळणार असून, भरती प्रक्रिया सुलभ होणार आहे.

सुधारित नियमांनुसार प्रत्येक उमेदवाराचे चालू चाचणी परीक्षेमधील जे गुण आहेत, ते मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह यापैकी केवळ एक वेळीच निवड करताना शिफारशीसाठीच लागू राहील. उमेदवाराला या सुधारित तरतुदीमध्ये सहभागी व्हायचे असल्यास नव्याने चाचणी परीक्षा द्यावी लागेल, तसेच पहिली ते पाचवी, आठवी ते नववी-दहावीच्या गटांसाठी उमेदवारांना आपली एकदा व्यावसायिक टीईटी ही अर्हता इंग्रजी, अथवा इतर भाषेची नोंदवल्यानंतर त्यात त्यांना शालांत परीक्षा ज्या विषयांतून उत्तीर्ण झाली; त्याच माध्यमांच्या शाळांमध्ये अर्ज करता येणार आहे. यामुळे इतर माध्यमांच्या उमेदवारांना इंग्रजीचे शिक्षण नसतानाही त्या माध्यमांच्या शाळांसाठी आग्रह आणि दबाव आणता येणार नाही. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे मुख्याध्यापक, शिक्षक संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे. दरम्यान, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ महेंद्र गणपुले यांनी सांगितले की, ‘पवित्र पोर्टलमार्फत केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रियेत प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना येणाऱ्या तांत्रिक चुका लक्षात घेऊन त्यात सुधारणा करण्यासाठी केलेले बदल योग्य आहेत. यामुळे भरती प्रक्रिया अधिक वेगाने होईल आणि विद्यार्थ्यांना वेळेवर शिक्षक उपलब्ध होतील; मात्र या सोबतच खासगी संस्थांच्या रोस्टर तपासणी क्रियेत होणाऱ्या विलंबाबाबतही शासनाने योग्य निर्देश देणे गरजेचे आहे अन्यथा रोस्टर अभावी पवित्र पोर्टल नोंदी करण्यास येणाऱ्या अडचणी कायम राहतील.’

प्राधान्यक्रम महत्त्वाचा
सुधारित नियमांनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये व खासगी शिक्षण संस्थांमधील शिक्षकांच्या रिक्त जागांसाठी स्वतंत्र प्राधान्यक्रम दिला जाईल. उमेदवार अर्ज भरताना अर्जामध्ये प्रवर्ग आणि आपल्या विषयांचा विचार करून प्राधान्यक्रम आता देऊ शकतील. उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्थानुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन्ही प्रकारासाठी सर्व प्राधान्यक्रम उपलब्ध होतील; मात्र, प्रत्येक उमेदवारास त्याच्या सोयीनुसार त्यापैकी जास्तीत जास्त एकूण ५० प्राधान्यक्रम लॉक करता येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com