ब्राम्हणपाडा प्रीमियर लीग उत्साहात

ब्राम्हणपाडा प्रीमियर लीग उत्साहात
Published on

ब्राम्हणपाडा प्रीमियर लीगमध्ये ब्लॅककॅप्स विजयी
कल्याण (बातमीदार) : अष्टविनायक क्रिकेट संघ आयोजित ब्राम्हणपाडा प्रीमियर लीग स्पर्धेच्या सहाव्या हंगामाच्या अंतिम लढतीत ब्लॅककॅप्स संघाने जेना इलेव्हनचा पराभव करीत पहिल्यांदाच चषकावर नाव कोरले. वयाचे बंधन नसलेल्या या स्पर्धेत सर्व वयोगटातील क्रिकेटप्रेमींनी उत्साहाने सहभाग घेतला. तरुण खेळाडू आर्यनने अष्टपैलू कामगिरी करत सामनावीर पुरस्कार पटकावला, तर ११ बळी घेणारा मनीष विश्वकर्मा मालिकावीर ठरला. फलंदाजीत किरण जाधव (१०६ धावा) आणि गोलंदाजीत प्रेम बोहरा (१३ बळी) यांनी बाजी मारली. अनुभवी सतीश सोनवणे यांनी उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा मान मिळवत वय फक्त आकडा असतो हे सिद्ध केले. आतापर्यंत शिंदे सरकार आणि आरसी ९००० संघांचे वर्चस्व मोडून काढत ब्लॅककॅप्सने नवे विजेतेपद मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com