रत्नागिरी जिल्हा मराठा जाति समाज व इनर व्हील क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात

रत्नागिरी जिल्हा मराठा जाति समाज व इनर व्हील क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात
Published on

रत्नागिरी जिल्हा मराठा जाती समाज व इनर व्हील क्लबतर्फे ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात
जोगेश्वरी, ता. २० (बातमीदार) : रत्नागिरी जिल्हा मराठा जाती समाज, मुंबई आणि इनर व्हील क्लब ऑफ मुंबई, पार्लेश्वर यांच्या संयुक्त सौजन्याने सोमवारी (ता. १९ जानेवारी २०२६) मेघवाडी सभागृहात संस्थेच्या ज्येष्ठ सदस्यांसह नागरिकांसाठी ब्लँकेट व वॉटर बॅग (वॉटर बॅग) वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत ७० ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमास इनर व्हील क्लब ऑफ मुंबईच्या अध्यक्षा भारती बिदारी, निवृत्त शाळा प्राचार्य पूनम पधारकामे तसेच डान्स अकॅडमीच्या मालक अर्पिता साठे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या तसेच रत्नागिरी जिल्हा मराठा जाती समाज या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमात संस्थेच्या प्रशासकीय समितीचे अध्यक्ष सुबोध बने आणि संस्थेचे कार्याध्यक्ष सहदेव सावंत यांनी मार्गदर्शन केले. सहदेव सावंत यांनी इनर व्हील क्लब ऑफ मुंबई, पार्लेश्वर यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करीत संस्थेचे आभार मानले. तसेच ऑक्टोबर २०२५मध्ये इनर व्हील क्लब ऑफ मुंबई यांनी बालविकास विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांना शूज वाटप केल्याचा उल्लेखही आपल्या भाषणात केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे चिटणीस यशवंत साटम यांनी केले, तर कार्यकारी सदस्या इंद्रायणी सावंत यांनी उपस्थितांचे आभार मानले. या वेळी संस्थेचे उपकार्याध्यक्ष गणपत तावडे, अशोक परब, चिटणीस सुरक्षा घोसाळकर तसेच आरजेएमडीएमएस डॉग्लस स्कूलचे सीईओ दीपक खानविलकर यांचीही उपस्थिती होती. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला असून, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संस्थांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com