तळ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारी जाहीर होण्यास विलंब

तळ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारी जाहीर होण्यास विलंब
Published on

तळ्यात राष्ट्रवादीच्या उमेदवारी जाहीर होण्यास विलंब
अर्ज भरण्याचे अवघे दोन दिवस; इच्छुकांसह मतदारांमध्ये संभ्रम
तळा, ता. २१ (बातमीदार) : रायगड जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून तयारीला वेग आला असताना, तळा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी जाहीर होण्यास होत असलेल्या विलंबामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही पक्षाकडून अद्याप जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा न झाल्याने इच्छुक उमेदवारांसह मतदारांमध्येही संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तळा तालुक्यात दोन जिल्हा परिषद सदस्य व चार पंचायत समिती सदस्य असा मर्यादित मतदारसंघ असला, तरी या वेळी प्रत्येक जागेसाठी तुल्यबळ व प्रभावी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढलेली दिसून येत आहे. त्यामुळे उमेदवारी निश्चित करताना पक्षश्रेष्ठींना योग्य समतोल साधावा लागत असून, निर्णय प्रक्रियेत विलंब होत असल्याचे बोलले जात आहे. पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांकडून उमेदवारांची संख्या वाढल्याने नाव निश्चित होण्यास वेळ लागत असल्याचे सांगितले जात असले, तरी पक्षांतर्गत उमेदवारीसाठी सुरू असलेली चढाओढ हेही विलंबामागचे प्रमुख कारण असावे, असा अंदाज राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. कोणालाही दुखावले जाऊ नये, पक्षांतर्गत नाराजी निर्माण होऊ नये आणि निवडणुकीत संघटनात्मक ताकद कायम राहावी, या दृष्टीने निर्णय घेताना पक्ष नेतृत्वाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्यास उशीर होत असल्याने प्रत्यक्ष अर्ज भरण्याची प्रक्रिया अद्याप सुरू न झाल्याचे चित्र आहे. याचा परिणाम प्रचार नियोजनावरही होण्याची शक्यता असून, पुढील दोन दिवसांत पक्षाकडून उमेदवारी जाहीर होणार का, याकडे तळा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com