जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल

जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल

Published on

जिल्हा परिषद मतदारसंघासाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल
भाजप दोन, उबाठा गट दोन, शेकाप एक, अपक्ष एक; शेवटच्या दिवशी वाढण्याची शक्यता
पेण, ता. २१ (वार्ताहर) : रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या आगामी निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असली, तरी पेण तालुक्यात राजकीय हालचालींना एक दिवस आधीच गती आली. मंगळवारी ता. २० रोजी वडखळ, दादर आणि शिहू या जिल्हा परिषद गटांसाठी आजपर्यंत एकूण सहा उमेदवारी अर्ज दाखल झाले.
मंगळवार (ता. २०)पर्यंत दाखल झालेल्या अर्जांमध्ये भाजपकडून दोन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून दोन, शेतकरी कामगार पक्षाकडून एक आणि एका अपक्ष उमेदवाराचा समावेश आहे. वडखळ गटासाठी भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील आणि माजी जिल्हा परिषद सभापती संजय जांभळे यांनी अर्ज दाखल केला आहे. दादर गटासाठी माजी जिल्हा परिषद सदस्य व भाजप जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. उबाठा गटाकडून वडखळ गटासाठी तालुकाप्रमुख समीर म्हात्रे, तर शिहू गटासाठी पल्लवी प्रसाद भोईर यांनी अर्ज दाखल केला आहे. विशेष म्हणजे पल्लवी भोईर यांनी अपक्ष म्हणूनही स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होण्याची चिन्हे आहेत. राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ५ फेब्रुवारी रोजी होत असून, अर्ज भरण्याची प्रक्रिया मागील तीन दिवसांपासून सुरू आहे. मात्र, पेण तालुक्यात कोणतीही ठोस युती अथवा आघाडी जाहीर न झाल्याने उमेदवारी निश्चितीस विलंब झाल्याचे चित्र आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com