भिवंडीतील हॉटेलमध्ये अनैतिक व्यवसाय

भिवंडीतील हॉटेलमध्ये अनैतिक व्यवसाय

Published on

भिवंडी, ता. २१ (बातमीदार) : पैशाचे प्रलोभन दाखवून महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या महिलांकडून वेश्याव्यवसाय करवून घेणाऱ्या एका महिलेविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या कारवाईमुळे शहरातील अनैतिक व्यवसाय करणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना कोनगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेल संदीप वेजेस येथे मंगळवारी (ता. २०) दुपारी ३.५५ वाजण्याच्या सुमारास घडली. सांताक्रूझ येथे राहणाऱ्या सुमारे ४० वर्षीय महिला दलालाने ३६ व ३३ वर्षीय दोन महिलांना पैशाचे प्रलोभन दाखवून संबंधित हॉटेलमध्ये आणले होते. या महिलांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, गिऱ्हाइकांच्या मागणीनुसार त्यांना शरीरसंबंध ठेवण्यास भाग पाडल्याचे तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी ठाणे शहर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलिस हवालदार विजय नाईक यांनी कोनगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेला अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com