अमराठी महापौराला विरोध

अमराठी महापौराला विरोध

Published on

अमराठी महापौराला विरोध
मराठी एकीकरण समितीचे आंदोलन
भाईंदर, ता. २१ (बातमीदार) : मिरा रोडमध्ये मराठी-अमराठी वाद महापौरपदाच्या निवडणुकीनिमित्त पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे. कारण या विषयांवरून मनसे व मराठी एकीकरण समिती पुन्हा आक्रमक झाली आहे.
मिरा रोडला मराठी बोलण्याच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी मिरा-भाईंदरचा महापौर उत्तर भारतीय व्हायला हवा, असे मत काही व्यक्त केले होते. तेव्हापासून मराठी-अमराठी वादाला शहरात तोंड फुटले होते. आता पालिका निवडणुकीनंतर पुन्हा एकदा मुद्द्याने जोर धरला आहे. कारण महापौरपदाचे आरक्षण गुरुवारी (ता. २२) पडल्यानंतर भाजपचा उमेदवार नक्की होणार आहे. मात्र, त्या आधीच मिरा-भाईंदरचा महापौर मराठीच असला पाहिजे, अशी ठाम भूमिका मराठी एकीकरण समिती, मनसेने घेतली आहे. तर मनसेनेही मराठी महापौर व्हावा, या मागणीसाठी बुधवारी (ता. २१) मिरा-भाईंदर महापालिकेच्या मुख्यालयाबाहेर आंदोलन केले आहे.
-----------------------------
थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
मिरा-भाईंदरमध्ये भाजपची सत्ता स्थापन होत आहे. या प्रक्रियेत मराठी माणसाचा मान, मराठी भाषेचा सन्मान अबाधित राहिला पाहिजे, पण स्थलांतरित झालेल्या अन्य भाषिकांचा आम्ही सन्मान करतो. मात्र, अमराठी महापौर झाल्यास सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिरा भाईंदराच्या आगामी महापौर मराठी व्हावा, अशी मागणी समितीने थेट मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवून केली आहे.
----------------------------
महापौरपदी भाजपचा नगरसेवक बसणार आहे. या पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराची निवड पक्षाच्या प्रदेश पातळीवर केली जाणार आहे.
- नरेंद्र मेहता, आमदार, भाजप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com