खाडी पुलाजवळ कामगाराचा मृत्यू
खाडीपुलाजवळ कामगाराचा मृत्यू
कासा, ता. २१ (बातमीदार) ः डहाणू पोलिस ठाणे हद्दीतील कंक्राटी खाडीवरील पुलाजवळ पाइप टाकण्याच्या कामावेळी पोकलेन मशीनचा धक्का लागून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी (ता. २०) सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
कामादरम्यान सिमेंटचा मोठा पाइप बेल्टमध्ये अडकवून पोकलेनद्वारे उचलण्यात येत होता. या वेळी पोकलेनचा चालक धर्मेंद्र सिंग याच्या नियंत्रणाखाली मशीन अचानक पाइपजवळ आली. त्या वेळी कंपनीतील कामगार सुरेश भोणार (रा. भोणार पाडा, रायताळी, गंजाड) अडकून दाबले गेले. या अपघातात त्यांच्या छातीला, डोक्याला गंभीर दुखापत झाली होती; मात्र गंभीर जखमांमुळे सुरेश भोणार यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी डहाणू पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

