परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्हीसाठी निधीचा मार्ग मोकळा

परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्हीसाठी निधीचा मार्ग मोकळा

Published on

परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्हीसाठी निधीचा मार्ग मोकळा

मुलुंड, ता. २१ (बातमीदार) : इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर आवश्यक भौतिक सुविधा उपलब्ध करून देणे आणि प्रत्येक वर्गात सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे सक्तीचे करण्यात आल्याने अनेक शैक्षणिक संस्था व शिक्षक संघटनांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. निधीअभावी ही अंमलबजावणी संस्थांवर अन्यायकारक ठरेल, अशी भावना व्यक्त होत होती. मात्र आता परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्हीसाठी निधीचा मार्ग मोकळा झाल्याने शैक्षणिक संस्थांमध्ये समानाधाचे वातावरण आहे.
मुलुंडचे सामाजिक कार्यकर्ते व मुंबई शहर शिक्षक विकास मंडळाचे प्रा. डॉ. विशाल कडणे यांनी शासनाकडे मागणी केली होती की, परीक्षा केंद्रांवरील सुविधा आणि सीसीटीव्ही बसविण्यासाठी स्वतंत्र विशेष निधी तातडीने उपलब्ध करून द्यावा, तसेच निधी मिळेपर्यंत सक्तीची अंमलबजावणी करू नये. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले की, १३ मे २०२२ च्या शासन निर्णयानुसार जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजना अंतर्गत शालेय शिक्षण विभागाशी संबंधित योजनांसाठी राखीव ठेवलेल्या पाच टक्के निधीचा वापर सीसीटीव्ही बसविण्यासाठी करता येईल, अशी तरतूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com