लगोरी चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा दबदबा

लगोरी चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राचा दबदबा

Published on

लगोरी स्पर्धेत महाराष्ट्राचा दबदबा

विरार, ता. २१ (बातमीदार) : चेन्नईच्या फिजिकल शैक्षणिक विद्यापीठात आयोजित ११ व्या वरिष्ठ राष्ट्रीय लगोरी स्पर्धेत गोवा, बिहार, हरियानासह १९ राज्यातील संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुली व मुले या संघांनी तृतीय स्थान पटकावले आहे.
तृतीय स्थानासाठी झालेल्या अंतिम सामन्यात मुलींच्या संघांनी तामिळनाडूचा ३-१ असा पराभव केला. तिसऱ्या सेटमध्ये केलेल्या दमदार पुनरागमनामुळे त्यांना विजय मिळवता आला. या संघाच्या कर्णधारपदी सुहाना गाजी, तर उपकर्णधारपदी मेघा सागर यांनी कामगिरी बजावली. मुलांनी अंतिम सामन्यात झारखंडचा ३-१ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर मुलांच्या संघांनी दमदार पुनरागमन केले व सलगचे दोन्ही सेट जिंकून झारखंडला धुळ चारली. या संघाचे नेतृत्व चिराग गाजी व उपकर्णधारपदी सचिन यादव यांनी कामगिरी बजावली. या दोन्ही संघाच्या विजयानंतर त्यांच्यावर राज्यस्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com