मेंढवण खिंडीत भीषण अपघात

मेंढवण खिंडीत भीषण अपघात

Published on

मेंढवण खिंडीतील अपघातात दोन ठार
भरधाव कारची नादुरुस्त ट्रकला धडक; एक गंभीर
मनोर, ता. २१ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवण खिंडीत बुधवारी पहाटे भीषण अपघात झाला. मुंबई वाहिनीवर नादुरुस्त असलेल्या ट्रेलरला भरधाव कारने पाठीमागून धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या अपघातात ट्रकचालक गौरव पाशा (वय ३०, रा. तुमसर, कर्नाटक) आणि कारचालक साहिल छेडी (वय ४०, रा. भरूच, गुजरात) यांचा जागीच मृत्यू झाला. बुधवारी पहाटे मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मेंढवण खिंडीत मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवरील पहिल्या लेनमध्ये ट्रेलर ट्रकचे टायर पंचर झाले होते. ट्रकचालक गौरव पाशा आणि त्याचा सहकारी पंचर झालेले टायर बदलण्याचे काम करीत असताना, मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव कारने थेट ट्रकला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ट्रकचालक आणि कारचालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या अपघातात ट्रकचालकाचा सहाय्यक आणि कारमधील एक प्रवासी गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेची माहिती मिळताच महामार्ग सुरक्षा विभागाचे पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना मनोर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर गंभीर जखमीला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती; मात्र क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त कार व ट्रक महामार्गावरून हटवण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास महामार्ग सुरक्षा विभागाकडून सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com