घरेलू कामगार महिलांची आज निदर्शने
घरेलू कामगार महिलांची आज निदर्शने
मुंबई, ता. २१ : काही खासगी कंपन्यांकडून घरेलू कामगार महिलांची ‘संभाव्य गुन्हेगार’ म्हणून बदनामी केली जात असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र राज्य घरेलू कामगार समन्वय समितीने केला आहे. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी गुरुवारी (ता. २२) आझाद मैदानावर दुपारी २ वाजता राज्यव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली आहे.
समितीने दिलेल्या माहितीनुसार, १० पैकी तीन घरेलू कामगार महिला गुन्हेगार असू शकतात, असा धक्कादायक आणि अपमानजनक दावा केला आहे. अशा जाहिरातींमुळे प्रामाणिकपणे कष्ट करणाऱ्या लाखो महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून, समाजात त्यांच्याविषयी अविश्वास आणि भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. तसेच, काही कंपन्यांनी महिलांचे फोटो त्यांच्या सोशल मीडिया आणि वेबसाईटवर प्रसिद्ध करून त्यांची जाहीर बदनामी केल्याचेही समितीने म्हटले आहे.
समितीचे निमंत्रक राजू वंजारे आणि ज्ञानेश पाटील यांनी सांगितले की, एकीकडे सरकार महिला सन्मानाची भाषा करते, तर दुसरीकडे खासगी कंपन्या त्यांना सर्रास गुन्हेगार ठरवत आहेत. हा विरोधाभास संतापजनक आहे. या कंपन्यांवर तातडीने कारवाई झाली नाही, तर उद्या आझाद मैदानासह संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र निदर्शने केली जातील. या आंदोलनाला राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळ (महाराष्ट्र), विदर्भ मोलकरीण संघटना, कष्टकरी संघर्ष महासंघ यांसह राज्यातील अनेक कामगार संघटनांनी पाठिंबा दिला आहे. ज्ञानेश पाटील, विलास भोंगाडे, उदय भट आणि इतर अनेक पदाधिकाऱ्यांनी या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

