किशोरी पेडणेकर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या गटनेते पदी

किशोरी पेडणेकर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या गटनेते पदी
Published on

किशोरी पेडणेकर शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या गटनेतेपदी
- उबाठाच्या सरिता म्हस्के यांची गट स्थापनेला अनुपस्थिती

बेलापूर, ता. २१ (बातमीदार) ः मुंबई महापालिकेत शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या गटनेतेपदी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची निवड करण्यात आली आहे. ठाकरे गटाचे ६४ नगरसेवक बुधवारी (ता. २१) गट स्थापनेच्या प्रक्रियेसाठी कोकण भवन आयुक्तांकडे आले होते. या वेळी वांद्रे पूर्वचे आमदार वरुण सरदेसाई उपस्थित होते.
गेल्या दोन दिवसांत काँग्रेस, शिंदेंची शिवसेना, मनसे यांनी गटनेते जाहीर केल्यानंतर आता प्रमुख पक्ष असणाऱ्या शिवसेना (ठाकरे) यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले होते. शिवसेनेने अद्याप आपले गटनेते कोण असतील, याबद्दल जाहीर भाष्य केले नव्हते. मात्र, महापौरपदासाठी गुरुवारी आरक्षण जाहीर होणार असून, त्याआधी गट स्थापन करण्यासाठी बुधवारी (ता. २१) ठाकरे यांच्या शिवसेनेने आपल्या गट स्थापनेची प्रक्रिया पूर्ण केली. यामध्ये माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या गटनेतेपदाची घोषणा करण्यात आली.

उबाठाच्या सरिता म्हस्के यांची गट स्थापनेला अनुपस्थिती
मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १५७ मधून मशाल चिन्हावर निवडून आलेल्या सरिता म्हस्के या शिंदे सेनेच्या गळाला लागल्याची माहिती आहे. शिवसेना उबाठाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांच्या शिवसेना भवनातील बैठकीत अनुपस्थितीनंतर ठाकरे सेनेचे सगळे नगरसेवक कोकण भवनात गट स्थापना करण्यासाठी गेले होते. त्या वेळीदेखील म्हस्के गैरहजर होत्या.

पक्षप्रमुखांचे आदेश, वरिष्ठांचे मार्गदर्शन, नव्या दमाच्या नगरसेवकांची साथ घेत मुंबईचे भले आम्ही करणार आहोत. सध्याच्या राजकीय समीकरणाबाबत मला कोणतेही भाष्य करायचे नाही. त्याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. गटनेते ही मोठी जबाबदारी आज मला दिली आहे. त्यानुसार कार्यरत राहील.
- किशोरी पेडणेकर, माजी महापौर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com