‘राष्ट्र प्रथम’ संकल्पनेवर आधारीत देशभक्तीच्या कवायती

‘राष्ट्र प्रथम’ संकल्पनेवर आधारीत देशभक्तीच्या कवायती

Published on

‘राष्ट्र प्रथम’ संकल्पनेवर आधारित देशभक्तीच्या कवायती
मुंबईत १० हजारांहून विद्यार्थी होणार सहभागी
मुंबई, ता. २२ ः प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून शालेय शिक्षण विभागाने ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेवर आधारित २६ जानेवारी रोजी देशभक्तीपर गीताच्या कवायतीत सुमारे दोन कोटी मुलांच्या सहभागाचे लक्ष ठेवले आहे. यात मुंबई महापालिकेच्या शाळांमधील सुमारे सहा हजार आणि शिक्षण उपसंचालक कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व माध्यमांच्या शाळांतील सुमारे चार हजारांहून अधिक विद्यार्थी सहभागी होण्याची शक्यता आहे.
२६ जानेवारी रोजी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायती करणार आहेत. हा कयातीचा कार्यक्रम सकाळी ध्वजारोहणानंतर संबंधित शाळा आणि स्थनिक प्रशासनाने नियोजित केलेल्या जागेवर होणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, स्वयंशिस्त, आरोग्य जागृती, शारीरिकदृष्टया कसरती, व्यायाम आदींसाठी प्रेरणा मिळावी, असे प्रयोजन यामागे निश्चित करण्यात आले असल्याची माहिती शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
राज्यासह मुंबईतील शाळांमध्येही देशभक्तीपर गीतांसाठी सराव करण्याचे आदेश यापूर्वीच शालेय शिक्षण ‍विभागाकडून देण्यात आले आहेत. त्यानुसार हा सराव सुरू असून, यासाठी विभागाने दिलेल्या सूचनांनुसार अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग नोंदवला जाणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

असा असेल पेहराव
देशभक्तीपर गीतांसाठी होणाऱ्या कवायतीच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना त्यांचे शालेय गणवेश, एनसीसी तसेच स्काऊटसारखे गणवेश निश्चित करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या हाताला तसेच मुलींच्या वेणीला तिरंगा रंगाची रिबीन लावली जाणार असून विद्यार्थ्यांना ज्या मैदानावर या कवायती करायच्या आहेत, त्या ठिकाणी त्यांचे गणवेश आदी खराब होणार नाहीत, याचीही काळजी घेतली जाणार आहे.

कवायतीसाठी एनसीसीची मदत
देशभक्तीपर गीतांच्या कवायीतीसाठी शाळांकडून एससीसीच्या शिक्षकांची मदत घेतली जात आहे. ज्या मुलांना शारीरिक त्रास आदी आहे, त्यांना या कवायतीमध्ये सामील करून घेऊ नये, अशा सूचनाही देण्यात आल्या असल्याची माहिती शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com