प्रजासत्ताक दिनी घुमणार देशभक्तीचा हुंकार

प्रजासत्ताक दिनी घुमणार देशभक्तीचा हुंकार

Published on

प्रजासत्ताकदिनी घुमणार देशभक्तीचा हुंकार
कल्याण-डोंबिवलीत विद्यार्थ्यांचे सामूहिक संचलन
कल्याण, ता. २२ (वार्ताहर) : आगामी २६ जानेवारीला भारतीय प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये एक अभूतपूर्व सोहळा रंगणार आहे. शिक्षण संचालकांच्या सूचनेनुसार, शहरातील सर्व माध्यमांच्या शासकीय व खासगी शाळांमधील लाखो विद्यार्थी देशभक्तीपर गीतांच्या तालावर सामूहिक कवायत आणि संचलन करणार आहेत. या उपक्रमासाठी गेल्या एक महिन्यापासून महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. दररोज २० मिनिटे संगीतबद्ध सामूहिक कवायतीचा सराव घेतला जात असून, शनिवारी विशेष एक तासाच्या सराव सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजवण्यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

२६ जानेवारीला कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या प्रत्येक गटांतर्गत आणि सीआरसी स्तरावर या सामूहिक संचलनाचे आणि संगीतबद्ध कवायतीचे भव्य सादरीकरण होणार आहे. यामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीमय होणार असून, विद्यार्थ्यांचा शिस्तबद्ध सराव पाहण्यासाठी नागरिकही उत्सुक आहेत.

अधिकारी प्रत्यक्ष मैदानावर
उपक्रमाची गांभीर्याने अंमलबजावणी व्हावी, यासाठी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी भारत बोरणारे आणि शिक्षणाधिकारी विजय सरकटे स्वतः मैदानावर उतरले आहेत. त्यांनी अलीकडेच मिलिंदनगर, शारदा मंदिर, मातोश्री रखमाबाई गायकवाड विद्यालय आणि नेतीवली (कल्याण पूर्व) येथील सीआरसी शाळांना भेटी दिल्या. या दौऱ्यात त्यांनी विद्यार्थ्यांच्या सरावाची प्रत्यक्ष पाहणी करून शिक्षकांना आवश्यक मार्गदर्शन व सूचना दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com