दुभाजकाला धडकलेल्या कारला आग

दुभाजकाला धडकलेल्या कारला आग

Published on

ठाण्यात दुभाजकाला धडकून कारला आग
ठाणे, ता. २२ : कोपरी परिसरातील बारा बंगला येथील सीएनजी पंपासमोर एका भरधाव कारने दुभाजकाला जोराची धडक दिली. या धडकेनंतर कारमध्ये अचानक किरकोळ आग लागल्याची घटना बुधवारी (ता. २१) रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. कारमधील चालक आणि इतर दोन प्रवाशांनी प्रसंगावधान राखून तातडीने बाहेर उडी घेतल्याने मोठा अनर्थ टळला. ठाण्याकडून मुंबईच्या दिशेने जात असताना सीएनजी पंपाजवळ ही कार चालकाचा ताबा सुटल्याने दुभाजकाला धडकली. अपघातानंतर इंजिनमध्ये ‘स्पार्क’ होऊन धूर निघू लागला आणि कारला आग लागली. ही बाब लक्षात येताच कारमधील तिन्ही व्यक्ती तत्काळ बाहेर पडल्या, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच, कोपरी अग्निशमन दल, शहर वाहतूक पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले; मात्र अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वीच वाहतूक पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यात यश मिळवले. सीएनजी पंपासमोरच ही घटना घडल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com