कासा ग्रामस्थ वलसाड भेटीवर

कासा ग्रामस्थ वलसाड भेटीवर
Published on

कासा ग्रामस्थ वलसाड भेटीवर
जिल्हा प्रशासनाच्या योजनेअंतर्गत मोहीम
कासा, ता. २२ (बातमीदार) ः गुजरातमधील वलसाड येथे घनकचरा व्यवस्थापनविषयक कार्यशाळा घेण्यात आली. याअंतर्गत कासा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सभासद, महिला बचत गट प्रतिनिधींनी भेट दिली. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून ही मोहीम सुरू आहे.
पालघर जिल्ह्यातील ५० गावांमध्ये या उपक्रमाअंतर्गत पिण्याच्या पाण्याची सुरक्षा व घनकचरा व्यवस्थापन सुविधा मजबूत करण्यासाठी प्रकल्प राबवला जात आहे. त्याच अनुषंगाने कासा ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सभासद, महिला बचत गट प्रतिनिधींनी वलसाड येथील अतुल फाउंडेशन आणि अतुल इंडस्ट्रीज यांच्या सहकार्याने आयोजित आदर्श गाव क्षेत्रभेटीत सहभाग घेतला. या भेटीदरम्यान कचरा विलगीकरण केंद्राची पाहणी करण्यात आली. ओला, सुका कचरा वेगळा करण्याची प्रक्रिया, त्यावर होणारी प्रक्रिया व व्यवस्थापन प्रकल्प प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली. स्वच्छता, कचरा व्यवस्थापन व ग्रामविकासाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या बाबींचे प्रशिक्षण, मार्गदर्शन देण्यात आले. कासा ग्रामपंचायतीत स्वच्छता अभियान प्रभावीपणे राबवण्यास क्षेत्रभेट उपयुक्त ठरेल, असा विश्वास सरपंच सुनीता कामडी यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com