ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
शहापूर-सापगाव रस्त्यावर भीषण अपघात
शहापूर, ता. २२ (वार्ताहर) : शहापूर-सापगाव रस्त्यावरील मुंबई-नाशिक महामार्गाखालून जाणाऱ्या पुलाच्या वळणावर गुरुवारी (ता. २२) सकाळी भीषण अपघात झाला. मालवाहू ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत एका ५७ वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून, अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे.
शिरगाव येथील रहिवासी मोतीराम मडके (वय ५७) हे गुरुवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपल्या सहकाऱ्यासह दुचाकीवरून जात होते. या वेळी शहापूर-सापगाव रस्त्याच्या खालून जाणाऱ्या पुलाच्या प्रवेशमार्गावर एक मालवाहू ट्रक वळण घेत होता. ट्रक वळत असताना दुचाकीला भीषण धडक बसली. या अपघातात मोतीराम मडके यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत दुचाकीवर असलेला दुसरा प्रवासी गंभीर जखमी झाला असून, त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पहाटेच्या वेळी झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघातप्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात संबंधित ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

