वर्क फ्रॉम होमच्या प्रलोभनातून ऑनलाईन फसवणूक
‘वर्क फ्रॉम होम’च्या प्रलोभनातून आठ लाखांची फसवणूक
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : घरबसल्या कामाच्या नावाखाली ऑनलाइन गुंतवणुकीचे प्रलोभन दाखवून ठाण्यातील एका गृहिणीला तब्बल सात लाख ९५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी वर्तकनगर पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत. १ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान तक्रारदार महिलेला त्यांच्या ‘इन्स्टाग्राम’ अकाउंटवर वर्क फ्रॉम होमची एक जाहिरात दिसली. या जाहिरातीवर क्लिक करताच ‘शिलपीता’ नावाच्या महिलेने व्हॉट्सॲपद्वारे संपर्क साधून त्यांना एका टेलिग्राम ग्रुपमध्ये जॉईन केले. तिथे त्यांची ओळख ‘साईली कांबळे’ आणि ‘विक्रम सिंगट’ नावाच्या व्यक्तींशी करून देण्यात आली.
सुरुवातीला या त्रिकुटाने तक्रारदाराला विविध हॉटेल्सचे ऑनलाइन रिव्ह्यू देणे आणि शेअर मार्केट ट्रेडिंगचे काम दिले. गुंतवणुकीसाठी एका वेबसाईटची लिंक देऊन त्यांना पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले. वेबसाईटवर तक्रारदाराला मोठा नफा होत असल्याचे आभासी चित्र दाखवण्यात आले. या नफ्याच्या प्रलोभनातून तक्रारदाराने विविध बँक खात्यांत वेळोवेळी सात लाख ९५ हजार रुपये जमा केले. वेबसाईटवर तक्रारदाराला ११ लाख ५२ हजार ४५० रुपयांचा नफा दिसत होता; मात्र जेव्हा त्यांनी हे पैसे काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपींनी तांत्रिक कारणे सांगून टाळाटाळ सुरू केली. उलट, नफ्याची रक्कम मिळवण्यासाठी आणखी सहा लाख रुपये गुंतवण्याचा दबाव त्यांच्यावर टाकला गेला. आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच महिलेने तत्काळ सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी साईली कांबळे, विक्रम सिंगट आणि शिलपीता यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू असून, आरोपींच्या बँक खात्यांचा आणि तांत्रिक पुराव्यांचा शोध घेतला जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

