माघी गणेश जयंती उत्साहात साजरी
तुर्भे, ता. २२ (बातमीदार) : नवी मुंबईत माघी गणेश जयंती गुरुवारी (ता. २२) भक्तिभावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. घरोघरी दीड दिवसांचे गणपती बसवण्यात आल्याने शहरात भक्तिमय वातावरण पसरले होते. तसेच काही ठिकाणी सार्वजनिक मंडळांनीदेखील गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
सकाळपासूनच विविध मंदिरांत दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. तुर्भे गावच्या रानातील गणोबा हे देवस्थान माघी गणेश जयंतीचे मुख्य आकर्षण ठरले. पहाटेपासून अभिषेक, महापूजा, अथर्वशीर्ष पठण, भजन, प्रवचन, तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांसाठी तुर्भे ग्राम देवस्थान कमिटीच्या वतीने नियोजनबद्ध तयारी करण्यात आली होती. सकाळी साडेपाच वाजता माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते श्री गणेशाची महापूजा झाली. त्यानंतर शांता महिला मंडळ, तसेच सूजाता सामंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी अथर्वशीर्ष आवर्तन सादर केले. दुपारी १२ वाजता श्री गणेश जन्मोत्सव सोहळा पार पडल्यानंतर भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तुर्भे नाका परिसरातील एमआयडीसीतील ‘रानातला गणपती’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही एकदिवसीय जत्रा भरवण्यात आली.
शिरवणे येथील पुरातन गणेश मंदिरातही माघी गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळपासूनच दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने अभिषेक, महापूजा, भजन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. नेरूळमधील श्री गणेश हाउसिंग सोसायटीमध्ये अनेक वर्षांपासून गणेश उत्सवाचे आयोजन केले जाते. याशिवाय कोपरी येथील भानगलेश्वर तलावाशेजारी असणाऱ्या गणेश मंदिरामागील ३५ वर्षांपासून माघी गणेश उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
महापालिकेच्या वतीने व्यवस्था
करावे गावातील गणेश मंदिरातदेखील भक्तिमय वातावरणामध्ये उत्सव साजरा करण्यात आला. नवी मुंबई महापालिकेच्या वतीने मूर्ती विसर्जनासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. विभागातील तलाव परिसरामध्ये सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. मूर्ती विसर्जित करण्यासाठी महापालिकेच्या वतीने मंडप उभारून सुरक्षा रक्षकांची नेमणूक केल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

