दहशतप्रकरणी दोन जण अटकेत

दहशतप्रकरणी दोन जण अटकेत

Published on

उल्हासनगर, ता. २२ (वार्ताहर) : कॅम्प एकमधील हरमन मोहता व दत्तवाडी परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या अक्षय यादव आणि दिनेश ससाने यांना उल्हासनगर पोलिसांनी अटक करत तपासाला गती दिली आहे. कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी येत्या काही दिवसांत विशेष गस्त कायम राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून फरार आरोपींचा शोध सुरू केला आहे.
उल्हासनगर कॅम्प एकमध्ये दुचाकीवरून आलेल्या १५ ते २० जणांच्या टोळक्याने २० ते २५ वाहनांची तोडफोड करत परिसरात दहशत निर्माण केली होती. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ तपास सुरू करत सीसीटीव्ही फुटेज, व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब संकलित केले. या पुराव्यांच्या आधारे संशयितांची ओळख पटवून अक्षय व दिनेश यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उर्वरित आरोपींच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवली जात आहे. त्यांच्या संभाव्य ठिकाणांवर छापे टाकले जात आहेत. रात्रीच्या वेळेस पोलिस पथकांची संख्या वाढवण्यात आली आहे. संवेदनशील भागांत गस्त अधिक कडक करण्यात आली आहे. दरम्यान, परिसरात शांतता राखण्यासाठी नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com