मैदानी खेळ महत्त्वाचे

मैदानी खेळ महत्त्वाचे

Published on

मैदानी खेळ महत्त्वाचे
माणगाव, ता. २२ (वार्ताहर) : डिजिटल व संगणकीय युगात विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करताना मैदानी खेळांकडे दुर्लक्ष करू नये, कारण शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक सक्षमतेसह सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी क्रीडा क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते पंकज तांबे यांनी केले. बामणोली (ता. माणगाव) येथील श्री संत गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित इंग्लिश स्कूलमध्ये आयोजित आंतरशालेय क्रीडा महोत्सवाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते.
गुरुवारी (ता. २२) सकाळी विद्यालयाच्या पटांगणावर क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन पंकज तांबे, सुबोध साळवी आणि शाळेची माजी विद्यार्थिनी परिचारिका स्वागता गुगले यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आर. डी. जगदाळे होते. या वेळी शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी तांबे यांनी शिक्षणाबरोबरच क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. स्वागता गुगले यांनी सातत्यपूर्ण मेहनत व संयमाचे महत्त्व सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित केले. क्रीडा शपथ, आकर्षक रांगोळी व विद्यार्थ्यांचा उत्साह या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरले.

फोटो ओळ - बामणोली येथे क्रीडा महोत्सवाचे उद्‍घाटन पंकज तांबे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com