बृहन्मुंबई महानगरपालिका क्रीडाभवन संघाने पटकावला मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन चषक

बृहन्मुंबई महानगरपालिका क्रीडाभवन संघाने पटकावला मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन चषक

Published on

बृहन्मुंबई महानगरपालिका क्रीडाभवन संघाने पटकावला मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन चषक
घाटकोपर, ता. २२ (बातमीदार) ः मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन यांच्या विद्यमाने, तसेच आरमार विक्रांत क्रीडा मंडळ व सर्कल किंग्ज मित्र मंडळ यांच्या सहकार्याने आयोजित मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन चषक स्पर्धा २०२६ मध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका क्रीडाभवन संघाने दिमाखदार कामगिरी करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण, कन्नमवार नगर, विक्रोळी (मुंबई) येथे दिवस-रात्र विद्युत रोषणाईत पार पडलेल्या अंतिम सामन्यात बृहन्मुंबई महानगरपालिका क्रीडाभवन संघाने आरमार विक्रांत क्रीडा मंडळ संघाचा २१-१८ असा पराभव करत चषकावर आपले नाव कोरले. स्पर्धेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महेश कदम यांनी चतुरस्त्र खेळीचे प्रभावी प्रदर्शन करत मालिकावीर पुरस्कार पटकावला. तर आरमार विक्रांत क्रीडा मंडळाच्या अय्याज सय्यद यांना सामनावीर आणि दिनेश वऱ्होकर यांना उत्कृष्ट नेटमन पुरस्काराने गौरविण्यात आले. बृहन्मुंबई महानगरपालिका संघाच्या या यशामागे संघाचे व्यवस्थापक व राष्ट्रीय खेळाडू जालंदर चकोर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण, शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण खेळ सादर करत विजेतेपद मिळवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com