मिरा-भाईंदरमध्ये महिला राज

मिरा-भाईंदरमध्ये महिला राज

Published on

मिरा-भाईंदरमध्ये महिलाराज
सलग पाचव्यांदा महापौरपदी विराजमान होणार
भाईंदर, ता. २२ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिकेचे महापौर सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाल्याने सलग पाचव्यांदा महापौरपदी महिला विराजमान होणार आहे. त्यामुळे महापालिकेतील महिलाराज कायम राहिले आहे.
मिरा-भाईंदर पालिकेतील महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. २००२ पासून महापालिकेत आठ महापौर झाले. त्यातील सहावेळा महापौरपदी महिला बसल्या आहेत, तर २०१२ पासून सलग चार वेळा महिलांकडेच पद राहिले आहे. त्या वेळी कॅटलीन परेरा, गीता जैन, डिंपल मेहता, ज्योत्स्ना हसनाळे यांनी पद भूषवले आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ९५ पैकी ५१ नगरसेविका निवडून आल्या आहेत. भाजपमध्ये सध्या शानु गोहिल, वंदना पाटील, डिम्पल मेहता, दीपिका अरोरा, अनिता पाटील, वंदना भावसार वरिष्ठ नगरसेविका आहेत. त्यामुळे यापैकी एका नावाचा विचार होऊ शकतो अथवा भाजपकडून धक्कातंत्र अवलंबत नवा चेहरा दिला जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com