रस्त्यालगत उभ्या कारवर नारळाचे झाड कोसळले
रस्त्यालगत उभ्या कारवर नारळाचे झाड कोसळले
कारचे मोठे नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : ठाण्यातील नौपाडा परिसरातील तीन पेट्रोलपंपाजवळ रस्त्यालगत उभ्या असलेल्या चारचाकी कारवर गुरुवारी सकाळी सुमारे पावणेदहा वाजण्याच्या सुमारास नारळाचे झाड कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही दुखापत झाली नसून संबंधित कारच्या बोनेटचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
नौपाडा येथील तीन पेट्रोलपंप परिसरात रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या चारचाकी वाहनावर नारळाचे झाड कोसळल्याची घटना घडली. या वेळी दक्ष नागरिक सुशांत सावंत यांनी तत्काळ ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. महापालिकेच्या पथकाने तत्काळ कारवर पडलेले नारळाचे झाड कापून बाजूला केले, त्यामुळे परिसरातील वाहतुकीला होणारा अडथळा दूर करण्यात आला. संबंधित कार ही राजेंद्र भुजबळ यांच्या मालकीची असून, झाड कोसळल्यामुळे कारच्या बोनेटचे मोठे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून देण्यात आली. मात्र, रस्त्यालगत असलेल्या झाडांची नियमित पाहणी व धोकादायक झाडांची छाटणी करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

