एका पत्र्याच्या खोलीतून वटवृक्षापर्यंतचा प्रवास

एका पत्र्याच्या खोलीतून वटवृक्षापर्यंतचा प्रवास
Published on

अंबरनाथ, ता. २२ (वार्ताहर) : शहरातील कामगार व सामान्य कुटुंबातील मुलांसाठी शिक्षणाची वाट खुली करणाऱ्या मदनसिंग मनविरसिंग मेमोरियल हायस्कूलचा ६०वा वर्धापन दिन (हीरक महोत्सव) आणि वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १९६५मध्ये विम्को कंपनीचे कर्मचारी व तत्कालीन नगराध्यक्ष दिवंगत मदनसिंग मनविरसिंग यांनी एका पत्र्याच्या खोलीत सुरू केलेल्या या शाळेने सहा दशकांचा गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे.
वर्धापनदिनानिमित्त झालेल्या दोनदिवसीय स्नेहसंमेलनात शाळेच्या सामाजिक व शैक्षणिक वाटचालीचा आढावा घेण्यात आला. सोहळ्याला नगराध्यक्षा तेजश्री करंजुले पाटील, माजी विद्यार्थी डॉ. श्रीकांत गर्जे, तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मार्गदर्शन करताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद व डॉ. श्रीकांत गर्जे यांनी शाळेच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीचे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे व सातत्यपूर्ण प्रगतीचे कौतुक केले. शाळेचे अध्यक्ष आर. सुरेंद्रन व संयुक्त सचिव कमलाकर सूर्यवंशी यांनी शाळेच्या वाटचालीची माहिती दिली, तर के. गोपालन यांनी वार्षिक अहवाल सादर केला. मुख्याध्यापिका मेरोज व माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक महेंद्र कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व विद्यार्थ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक सादरीकरणाने संपूर्ण कार्यक्रमात रंगत भरली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com