सत्तेची सूत्रे ''रईस शेख'' यांच्या हाती?

सत्तेची सूत्रे ''रईस शेख'' यांच्या हाती?

Published on

सत्तेची सूत्रे ‘रईस शेख’ यांच्या हाती?
भिवंडीत महापौरपदासाठी तारिक मोमीन यांचे नाव चर्चेत
भिवंडी, ता. २२ (वार्ताहर) : भिवंडी-निजामपूर शहर महापालिकेचे महापौरपद ‘सर्वसाधारण’ गटासाठी आरक्षित झाल्याने राजकीय गणितांना वेग आला आहे. महापालिकेत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी सत्तेच्या या सारीपाटात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख हे ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आले आहेत. त्यांच्या पसंतीचे निकटवर्तीय तारिक मोमीन यांच्या नावाची चर्चा सध्या महापौरपदासाठी आघाडीवर आहे.

निवडणुकीच्या निकालात काँग्रेसचे ३० नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रातील २४ नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे १२ नगरसेवक निवडून आणण्यामागे आमदार रईस शेख यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या रईस शेख यांच्याकडेच राहण्याची दाट शक्यता आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या ४६ या आकड्यापर्यंत पोहोचण्यासाठी काँग्रेस (३०) आणि राष्ट्रवादी (१२) या आघाडीला अवघ्या चार सदस्यांची गरज आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी (६), कोणार्क (४) आणि भिवंडी विकास आघाडी (३). या समीकरणामुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवून काँग्रेस पुन्हा एकदा महापालिकेत सत्तेवर आरूढ होण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.

काँग्रेसच्या निवडून आलेल्या ३० सदस्यांमध्ये अनुभवी नेत्यांची संख्या कमी असून, अनेक जण नवखे आहेत. अशा परिस्थितीत, प्रशासकीय कामाचा अनुभव असलेले आणि आमदार रईस शेख यांचे विश्वासू सहकारी तारिक मोमीन यांचे नाव महापौरपदासाठी आघाडीवर आहे. त्यांच्या नावामुळे काँग्रेस आणि मित्रपक्षांमध्ये एकवाक्यता निर्माण होऊ शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

...तर उपमहापौर राष्ट्रवादीचा
माजी उपमहापौर इमरान खान यांनी सत्तेबाबतचा विश्वास व्यक्त करताना सांगितले की, "आमचे सत्तासमीकरण स्पष्ट आहे. महापौर काँग्रेसचा आणि उपमहापौरपद राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडे असेल. ही आघाडीच भिवंडीचा विकास करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com