आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळांचा सहभाग घटला

आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळांचा सहभाग घटला

Published on

आरटीई प्रवेश प्रक्रियेत शाळांचा सहभाग घटला
चालू शैक्षणिक वर्षासाठी ६०० पैकी केवळ ४३९ शाळांची नोंदणी
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २२ : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) खासगी विनाअनुदानित व स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेसाठी यंदा ठाणे जिल्ह्यात शाळांचा सहभाग घटल्याचे चित्र समोर आले आहे. मागील शैक्षणिक वर्षात जिल्ह्यातून ६०० हून अधिक शाळांनी आरटीई प्रवेश प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता. मात्र शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी आतापर्यंत केवळ ४३९ शाळांचीच ऑनलाईन नोंदणी पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा शिक्षण विभागाने दिली आहे. त्यामुळे मुदतवाढ देऊनही अपेक्षित संख्येपर्यंत शाळांची नोंदणी होईल का, याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळावी, यासाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवली जाते. या प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात शाळा नोंदणी व शाळा पडताळणीचा समावेश असून, सुरुवातीला ही प्रक्रिया १९ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र अनेक शाळांची नोंदणी व पडताळणी अद्याप पूर्ण न झाल्याने प्रशासनाने शाळा नोंदणीसाठी २७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही अंतिम मुदत असून, या कालावधीत सर्व संबंधित शाळांनी ऑनलाईन नोंदणी व पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. दरम्यान, शाळा पडताळणीच्या प्रक्रियेत बंद झालेल्या, अल्पसंख्याक दर्जा प्राप्त, अनधिकृत तसेच स्थलांतरित शाळांचा आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रियेत समावेश केला जाणार नसल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच ज्या शिक्षण मंडळाची शाळेला मान्यता आहे, त्याच मंडळाची माहिती नोंदणीदरम्यान नमूद करणे आवश्यक असल्याचेही सांगण्यात आले आहे. आरटीई प्रवेश प्रक्रिया पारदर्शक, अचूक व वेळेत पूर्ण व्हावी यासाठी सर्व महापालिकांचे शिक्षणाधिकारी तसेच पंचायत समितींचे गटशिक्षणाधिकारी यांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
...............
चौकट :
मुदतीतन नोंदणी गरजेची
आरटीईअंतर्गत २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ही समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल व वंचित घटकातील बालकांना दर्जेदार शिक्षण व समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व संबंधित शाळा प्रशासनांनी दिलेल्या अंतिम मुदतीत आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा परिषद ठाण्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com