महाराष्ट्र वक्फ मंडळावर फैयाज खान यांची नियुक्ती

महाराष्ट्र वक्फ मंडळावर फैयाज खान यांची नियुक्ती

Published on

महाराष्ट्र वक्फ मंडळावर फैयाज खान यांची नियुक्ती
नवी मुंबई, ता. २२ (वार्ताहर) : महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने फैयाज खान यांची महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर येथे दोन वर्षांच्या प्रतिनियुक्तीवर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.
सिडकोमध्ये कार्यरत असताना फैयाज खान यांनी वसाहत विभाग, संगणक प्रणाली विभाग तसेच पणन विभागामध्ये धोरणात्मक विचारसरणीच्या आधारे अनेक महत्त्वपूर्ण उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी केली. धोरण व रणनीती आखणी, नागरिकाभिमुख व वापरकर्ता-सुलभ वेब पोर्टल्सची निर्मिती, एसएपी प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी तसेच कार्यपद्धती अधिक सुलभ, पारदर्शक आणि आधुनिक करण्यामध्ये त्यांचे योगदान अत्यंत मोलाचे ठरले आहे. फैयाज खान हे स्थापत्य अभियंता असून त्यांनी एमबीए (मार्केटिंग), एलएलबी तसेच एपीजीडीयूएम या पदव्या संपादन केल्या आहेत. तांत्रिक, व्यवस्थापकीय आणि कायदेशीर ज्ञानाचा समतोल व प्रभावी वापर करण्याची त्यांची क्षमता ही त्यांची मोठी ताकद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com