बी. डिझाईन सीईटीच्या प्रवेश नोंदणीला सुरूवात

बी. डिझाईन सीईटीच्या प्रवेश नोंदणीला सुरूवात

Published on

बी. डिझाइन सीईटीची प्रवेश नोंदणी सुरू

मुंबई, ता. २२ ः राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी बी. डिझाइन या अभ्यासक्रमाच्या सीईटीच्या प्रवेश नोंदणीस गुरुवारी (ता. २२) सुरुवात झाली असून ही नोंदणी २४ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
या परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज, नोंदणी वेळापत्रक आणि माहिती पुस्तिका राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या www.mahacet.org या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अभ्यासक्रमांसाठीची सीईटी परीक्षा महाराष्ट्र राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर संगणकाधारित पद्धतीने ऑनलाइन घेतल्या जाणार असल्याचे सीईटी सेलकडून सांगण्यात आले. दरम्यान, एमएचटी सीईटी पीसीएम व पीसीबी समूह, एमबीए/एमएमएस, एमसीए, तीन व पाचवर्षीय एलएलबी, बीएड, एमएड, बीएड-एमएड (तीनवर्षीय एकत्रित अभ्यासक्रम), एमपीएड, एमएचएमसीटी या अभ्यासक्रमाच्या सीईटी प्रवेश परीक्षेची नोंदणी सुरू झाली आहे. राहिलेल्या एएसी (फाईन आर्ट), डीपीएन / पीएचएन (वैद्यकीय) व नर्सिंग या अभ्यासक्रमाच्या सीईटी नोंदणीसही लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती राज्य सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी दिली.
--
असे असेल वेळापत्रक
सीईटी ------------------------------------------ नोंदणीची सुरुवात--------------------- नोंदणीची अंतिम तारीख --------------------- परीक्षेची संभाव्य तारीख
बी. डिझाइन सीईटी २०२६--------------------- २२ जानेवारी --------------------- २४ फेब्रुवारी --------------------- ५ एप्रिल २०२६
...
मागील तीन वर्षांत प्रवेश परीक्षेस नोंदणी केलेले विद्यार्थी
प्रवेश परीक्षा--------------------- २०२३-२४ --------------------- २०२४-२५ --------------------- २०२५-२६
बी. डिझाइन --------------------- ७०२ --------------------- १,१२८ --------------------- १,३२८

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com