सुट्यांच्या गर्दीसाठी मध्य रेल्वेचा दिलासा; मुंबईहून नागपूर, गोव्यासाठी विशेष गाड्या

सुट्यांच्या गर्दीसाठी मध्य रेल्वेचा दिलासा; मुंबईहून नागपूर, गोव्यासाठी विशेष गाड्या

Published on

सुट्ट्यांमधील गर्दीसाठी मध्य रेल्वे सज्ज
मुंबईहून नागपूर, गोव्यासाठी विशेष गाड्या

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ : प्रजासत्ताकदिनाच्या जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे बाहेरगावी फिरायला जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबई ते नागपूर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते मडगाव यादरम्यान चार विशेष रेल्वेसेवा चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्यांचे आरक्षण भारतीय रेल्वेच्या आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेन क्रमांक ०२१३९ सीएसएमटी-नागपूर विशेष गाडी शनिवार, २४ जानेवारीला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.२० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्रमांक ०२१४० नागपूर-सीएसएमटी विशेष गाडी शनिवार, २४ जानेवारीला नागपूर येथून रात्री ८.०० वाजता सुटेल आणि सीएसएमटी येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १.३० वाजता पोहोचेल. या दोन्ही दिशेच्या गाड्या दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा या स्थानकांवर थांबणार आहेत.
...
गोव्यासाठी विशेष गाड्या
ट्रेन क्रमांक ०११२९ एलटीटी-मडगाव विशेष गाडी रविवार, २५ जानेवारीला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून मध्यरात्री १.०० वाजता सुटेल आणि मडगाव येथे त्याच दिवशी दुपारी १२.०० वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी ट्रेन क्रमांक ०११३० मडगाव-एलटीटी विशेष गाडी रविवार २५ जानेवारीला मडगाव येथून दुपारी २.३० वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता पोहोचेल. या दोन्ही दिशेच्या गाड्या ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com