क्रॉफर्ड मार्केटमधील मराठी व्यापाऱ्यांवर कारवाई

क्रॉफर्ड मार्केटमधील मराठी व्यापाऱ्यांवर कारवाई

Published on

क्रॉफर्ड मार्केटमधील मराठी व्यापाऱ्यांवर कारवाई
मच्छीमार संघटना आक्रमक

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २२ ः क्रॉफर्ड मार्केटमध्ये वर्षानुवर्षे व्यवसाय करणाऱ्या मराठी व्यापाऱ्यांवर पालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाई केल्याने मच्छीमार संघटना आक्रमक झाल्या आहेत. महापालिकेच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
क्रॉफर्ड मार्केटमध्ये वर्षानुवर्षे व्यवसाय करण्याऱ्या मराठी व्यावसायिकांना हुसकावून लावण्याचा हा प्रयत्न असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. पालिकेने केलेल्या या कारवाईचा अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने निषेध केला असून, अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या मार्केटमध्ये कृषिविक्रेते, कोळी समाजातील मच्छीविक्रेत्या महिला, कोंबडी व मांसविक्रेते अशा ६००पेक्षा अधिक अधिकृत परवानाधारक व्यापाऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. हे बाजार केवळ व्यापाराचे ठिकाण नसून मराठी माणसाच्या आर्थिक आणि सामाजिक अस्तित्वाचा कणा आहेत. पालिकेच्या बाजार विभागातील अधिकाऱ्यांनी कोणतीही पूर्वसूचना, सुनावणी किंवा कागदपत्रांची तपासणी न करता धडक कारवाई केल्याने कोळी महिलांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला, असे संघटनेचे म्हणणे आहे.
...
कोळी समाज मूळ मुंबईकर असून, क्रॉफर्ड मार्केटमध्ये कोळी महिला वर्षानुवर्षे मासेविक्रीचा व्यवसाय करीत आहेत. त्यांना तेथून हटविण्याचा डाव आहे. आम्ही त्याविरोधात आंदोलन करू.
- देवेंद्र तांडेल, अध्यक्ष, अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com