कुर्ला दंडाधिकाऱ्यांना सत्र न्यायालयाची कारणे दाखवा नोटीस
कुर्ला दंडाधिकाऱ्यांना
कारणे दाखवा नोटीस
जामिनानंतरही आरोपीची सुटका न करणे अवमानकारक
मुंबई, ता. २२ : वरिष्ठ न्यायालयाने जामीन मंजूर करूनही एका व्यक्तीची सुटका न केल्याबद्दल सत्र न्यायालयाने कुर्ला येथील दंडाधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस बजावली. दंडाधिकाऱ्यांची कृती स्पष्टपणे अवमान असल्याचे ताशेरेही न्यायालयाने ओढले.
संबंधित व्यक्तीच्या सुटकेतील विलंबाला सत्र न्यायाधीश मुजीबुद्दीन समदसाब शेख यांनी बेकायदा अटक असल्याचे नमूद करून त्याला तत्काळ सोडण्याचे आदेश दिले. जामिनाच्या अटी पूर्ण करूनही आरोपी कोठडीत आहे. त्यामुळे बेकायदा अटकेची स्थिती निर्माण झाल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आणि न्यायालयाने आपल्याच कार्यालयाला १५ हजार रुपयांचा वैयक्तिक बंधपत्र स्वीकारण्याचे आणि आरोपीची तत्काळ सुटका करण्याचे आदेश दिले. दुसरीकडे, अवमान आणि बेकायदा अटकेबद्दल शिस्तभंगाची कारवाई का केली जाऊ नये, याचे स्पष्टीकरण मागण्यासाठी कुर्लास्थित प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

