अश्रफ शानू पठाण यांची गटनेतेपदी निवड

अश्रफ शानू पठाण यांची गटनेतेपदी निवड

Published on

अश्रफ शानू पठाण यांची गटनेतेपदी निवड
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २३ : राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक अश्रफ (शानू) पठाण यांची ठाणे महापालिकेत गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. तसे पत्र जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्तांना दिले आहे.
ठाणे महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे १२ नगरसेवक विजयी झाले आहेत. शुक्रवारी जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आपल्या १२ नगरसेवकांसह कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेऊन गटस्थापना करीत असल्याचे पत्र दिले. महापालिकेत पक्षाचा स्वतंत्र गट असणार आहे. अश्रफ शानू पठाण हे ज्येष्ठ नगरसेवक असून, मागील सत्रात त्यांनी विरोधी पक्षनेतेपदही भूषविले आहे. ते यंदा सलग प्रभाग क्रमांक ३२ मधून तिसऱ्यांदा नगरसेवक झाले असून, आपले पॅनेल त्यांनी मोठ्या फरकाने जिंकले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com