नवी मुंबई पालिका भाजपा गटनेतेपदी सागर नाईक यांची निवड
गटनेतेपदी सागर नाईक यांची निवड
भाजपच्या ६६ नगरसेवकांची कोकण भवन येथे नोंदणी
वाशी, ता. २३ (बातमीदार) ः नवी मुंबई भारतीय जनता पक्षाने गटनेत्यासह ६६ नगरसेवकांची कोकण भवन येथे शुक्रवारी (ता. २३) नोंदणी केली आहे. या वेळी माजी खासदार संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक, जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेश पाटील, माजी महापौर सागर नाईक, अभिजित पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
वनमंत्री नामदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वात नवी मुंबई महापालिकेत ६५ नगरसेवकांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. सत्तास्थापनेसाठी भाजपकडे पूर्ण बहुमत आहे. नवी मुंबई महापालिकेत भाजपचा गटनेता म्हणून माजी महापौर सागर नाईक यांची निवड करण्यात आली आहे. कोकण भवन येथे ६६ नवनिर्वाचित नगरसेवकांनी अधिकृत गट नोंदणी केली. १४ ड मधून निवडून आलेले भरत भोईर या अपक्ष नगरसेवकानेदेखील भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपचे संख्याबळ ६६ वर गेले आहे.
या वेळी माजी खासदार संजीव नाईक म्हणाले, की सर्वसंमतीने सागर नाईक यांची गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि वरिष्ठ नेत्यांच्या स्तरावर महापौर कोण होणार, याचा निर्णय होईल. तर गटनेतेपदी निवडीवर सागर नाईक यांनी सहकारी नगरसेवकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांना धन्यवाद दिले. चौदा गावांचा विकास गणेश नाईक यांच्याच नेतृत्वात होईल, असा विश्वास अपक्ष नगरसेवक भरत भोईर यांनी व्यक्त केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

