सफाळे स्थानकात भुयारी मार्गाऐवजी पादचारी पुल
सफाळे स्थानकात भुयारी मार्गऐवजी आता पादचारी पूल
प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचा नवा निर्णय
पालघर, ता.२४ : सफाळे येथील रेल्वे फाटक बंद झाल्याने निर्माण झालेली वाहतुकीची कोंडी आणि प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी आता तेथे पादचारी पूल (FOB) उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तांत्रिक कारणांमुळे भुयारी मार्ग शक्य नसल्याने, रेल्वेने या नव्या पर्यायाचा व्यवहार्यता अभ्यास करण्याचे मान्य केले आहे.
मुंबई-दिल्ली समर्पित मालवाहू रेल्वे प्रकल्पामुळे सफाळे पूर्व-पश्चिमेला जोडणारे महत्त्वाचे फाटक बंद करण्यात आले होते. नागरिकांनी येथे भुयारी मार्गाची मागणी केली होती, मात्र रेल्वेच्या चौपदरीकरणामुळे या ठिकाणी लोहमार्गाचा विस्तार मोठा आहे. भुयारी मार्गासाठी किमान १५ फूट खोल खोदाई करणे आवश्यक आहे. दुतर्फा जोड रस्ते आणि पायऱ्यांच्या उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात भूसंपादनाची गरज होती. या तांत्रिक अडचणींमुळे रेल्वेच्या तज्ज्ञ समितीने भुयारी मार्ग व्यवहार्य नसल्याचे मत नोंदवले होते.
सफाळे रेल्वे स्थानकाच्या प्रलंबित प्रश्नांवर खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी पश्चिम रेल्वेच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकांसोबत अडीच तास सविस्तर चर्चा केली. या बैठकीला सफाळे रेल्वे संघर्ष समितीचे पदाधिकारीही उपस्थित होते.नव्याने प्रस्तावित असलेल्या या पुलाची व्यवहार्यता तपासण्यासाठी आणि प्रत्यक्ष जागेची पाहणी करण्यासाठी रेल्वेचे अभियांत्रिकी विभागाचे अधिकारी लवकरच सफाळे स्थानकाला भेट देणार आहेत. त्यानंतर या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होईल.
बैठकीतील महत्त्वाचे निर्णय:
१. नवा पादचारी पूल: जुन्या रेल्वे फाटकाच्या जागेवरच नवीन पादचारी पूल उभारला जाईल.
२. अत्याधुनिक सुविधा: या पुलाला सरकता जिना आणि लिफ्ट जोडण्याचे रेल्वेने तत्त्वतः मान्य केले आहे.
३. शेतकरी-विक्रेत्यांना दिलासा: सध्याचा पूल ३७० मीटर दूर असल्याने दूध, फळभाज्या आणि मासळी विक्रेत्यांची गैरसोय होत होती. नव्या पुलामुळे हा त्रास कमी होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

